पृथ्वीराज चव्हाण सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवार, दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कराड येथील निवडणुक अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

व्यापाऱ्यांच्या मागणीला मान : दिपावली सणाच्या अनुषंगाने व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोय होऊ नये, म्हणून व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून शक्तीप्रदर्शन न करता मागच्या वेळी सारखेच यावेळी सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने आ. पृथ्वीराज चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन : याप्रसंगी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!