आ. बाळासाहेब पाटील; लाडेगाव व रेवली येथे कार्यकर्त्याची बैठक
कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील बेरोजगारी, वाढती महागाई व गुन्हेगारी, सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजा यांकडे सरकारचे लक्ष नसून, निव्वळ सवंग लोकप्रियतेसाठी विविध योजनांची घोषणा सरकारकडून होत आहे, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
लाडेगाव व रेवली येथे कार्यकर्त्यांची बैठक : खटाव तालुक्यातील डेगाव व रेवली येथील कार्यकर्त्याच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्रदादा पवार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण, सुरेश पाटील (बापू) यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात सत्ता परिवर्तनाचे वारे : कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माझे सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यात सत्ता परिवर्तनाचे वारे असून, महाविकास आघाडीचे लोकाभिमुख सरकार लोकांना अपेक्षित आहे. त्याकरीता आपण सर्वानी आपापसातील मतभेद विसरून विकासाच्या पाठीशी खंबीरपेणे उभे राहूया. लाडेगाव आणि परिसराशी कारखान्याच्या माध्यमातून असलेला जिव्हाळा, मतदारसंघाच्या पुनर्रचनेत अधिक मजबूत झाला. मला मिळालेल्या अधिकारातून उपलब्ध होणारा विकासनिधी मी मतदारसंघातील जनतेसाठी 100 टक्के विनियोग करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मंत्रिपदाचा कार्यकाळ अजून राहिला असता, तर लक्षणीय विकासकामे करता आली असती, असे सांगून येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक कृष्णत पाटील, तर संतोष कदम यांनी आभार मानले.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार (दादा), सुरेश पाटील (बापू), कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण (खोडशी), विलास शिंदे, मोहम्मद आवटे, दत्तात्रय रुदृके, सुरेश कदम, उपसरपंच सागर दीक्षित, सावळा यादव, रामचंद्र वाईकर, विष्णू वाईकर, बाळासाहेब यादव, बबन सुतार, माजी सरपंच संतोष कदम, उत्तम यादव (तात्या), कृष्ण पाटील, साईनाथ यादव, दीपक राऊत (फौजी), कुंडलिक घाडगे बाबासो यादव, शिवाजी दबडे, नाथा यादव, अनिल उमापे, बाळासो उमापे, सचिन यादव, हणमंत घाडगे, भिमराव तिडके, योगेश यादव, जयवंत यादव, गणेश यादव यांच्यासह लाडेगाव व रेवली येथील ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.