कराड उत्तरमध्ये परिवर्तन घडवूया

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रामकृष्ण वेताळ यांचे आवाहन; हजारमाची येथे परिवर्तन यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तरमधील विकासाची गती कायम राखण्यासाठी परिवर्तन घडवूया. कराड उत्तर हा राज्यामध्ये अग्रेसर असलेला मतदारसंघ घडवण्यासाठी भाजपाच्या पाठीशी उभे राहून परिवर्तनाच्या लाटेने विरोधी सत्ता उलटवून विकासाची गती कायम राखुया, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती : हजारमाची (ता. कराड) येथे परिवर्तन यात्रेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी कृषी सभापती भिमराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, दीपक लिमकर, सुरेश कुंभार, बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण, समन्वयक महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

परिवर्तन यात्रेचे स्वागत : सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड उत्तर मतदारसंघांमध्ये परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे संपूर्ण कराड उत्तरेमध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. ही यात्रा रविवारी ओगलेवाडी परिसरात होती. हजारमाची येथील राजवर्धन मल्टीपर्पज हॉलमध्ये या यात्रेचा समारोप करण्यात आला.

निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरी बसवण्याची वेळ : रामकृष्ण वेताळ म्हणाले, निष्क्रिय आणि बिनकामाच्या लोकप्रतिनिधीला घरी बसवण्याची वेळ आली आहे. यावेळी हे काम आपण करून कराड उत्तर मतदारसंघात बदल घडवूया.

सरकारच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ : या कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली. त्याचबरोबर महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण आणि इतर योजनांमुळे लोकांचे जीवन कसे उंचावले असून याबाबतची माहितीही त्यांनी दिली. 

मान्यवरांचे मनोगत : यावेळी सीमा घार्गे शंकर शेजवळ, भिमराव पाटील, चंद्रकांत मदने,दीपक लिमकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पोळ यांनी केले. तर दादा डुबल यांनी आभार मानले.

नागरिक, महिलांची लक्षणीय उपस्थिती : या कार्यक्रमाला हजारमाची, राजमाची, वनवासमाची, सुर्ली, कामथी, करवडी विरवडे या परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. रात्रीच्या वेळी ही सभा घेण्यात येऊनही महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात या सभेला लाभली होती. यावेळी विनोद डुबल, हजारमाची माजी उपसरपंच सतीश पवार, महेश जाधव, जयश्री पवार बाळासाहेब पवार जयसिंग डांगे शिवाजीराव डुबल, अक्षय चव्हाण, रणजीत थोरात, प्रकाश पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करणार 

भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु, या सर्वांनी पक्ष देईल त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण एकजुटीने उभे राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे एकी हेच भाजपाचे बळ आहे, हे ओळखण्यात ते यशस्वी झाले असल्याचे यावेळी दिसून आले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!