कराडमध्ये 209 कोटींच्या विकासकामांचे सोमवारी भूमिपूजन 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध 

कराड/प्रतिनिधी : –

यशवंत विकास आघाडीचे नेते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अथक पाठपुराव्याने कराड शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे 209 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 14) रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती : या कामांचे भूमिपूजन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार असून राजेंद्रसिंह यादव यांच्यासह यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विविध कार्यक्रमांच्या आयोजन :

हा कार्यक्रम नवीन जलशुद्धीकरण केंद्र येथे होणार आहे. त्यानंतर यशवंत हायस्कूल पाठीमागील लल्लुभाई मैदान येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा सकाळी 11 वाजता होणार आहे. तसेच त्यानंतर भव्य महिला महोत्सवास प्रारंभ होणार आहे.

या कामांसाठी 260 कोटींचा निधी : कराड शहरातील भुयारी गटार योजनेचे अद्ययावतीकरण व सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 160 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्याने मंजूर केलेला आहे. याशिवाय अन्य विकासकामे अशा एकूण 209 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राजेंद्रसिंह यादव यांनी केले आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!