कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने सहावा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे हस्ते व युवा नेते डाॅ. अतुलबाबा भोसले यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
हा पुरस्कार वितरण सोहळा समर्थ मल्टीपर्पज हाॅल, गजानन हौसिंग सोसायटी (कराड) येथे रविवार, दि. 6 सकाळी 11 वाजता होणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख मान्यवर : या कार्यक्रमास खा. नितीनकाका पाटील, आ. जयकुमार गोरे, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, योजना कार्यालयाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गट शिक्षणाधिकारी बिपीन मोरे, राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष आनंदराव कोळी, राज्य उर्दू विभाग प्रमुख अनवर हुसेन उपस्थित राहणार आहेत.
100 आदर्श शिक्षकांचा होणार सन्मान : राज्यातील 100 आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शाळा, आदर्श प्रशासन अधिकारी, आदर्श तंत्रस्नेही, शिक्षकेतर कर्मचारी, सक्षम महिला यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील 27 जिल्ह्यातील सुमारे 1 हजार शिक्षक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.