ज्ञानयज्ञ श्रवणाचा लाभ घ्या : यामध्ये श्री अंबामाता मंदिराच्या पुजारी, कथा प्रवक्त्या, ह. भ. प. सौ. विजया अशोक गुरव (उरुण – इस्लामपूर) या मार्गदर्शन करणार आहेत. 3 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2024 या काळात दररोज दुपारी 3 ते 3 वाजेपर्यंत होणाऱ्या या ज्ञानयज्ञात श्री विष्णूंच्या दशावताराचे प्रल्हाद चरित्र, ध्रुव चरित्र, विश्व उत्पत्तीचे वर्णन, घोर कलियुगातून मानवाला कल्याणचा मार्ग काढणे याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या ज्ञानयज्ञ श्रवणाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन घेता महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : सौ. रेश्मा माळवदे (8830045320), सौ. आरती पाटील (9028894165) व सौ. माया गुरव (9373817481) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गीता महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.