कराड/प्रतिनिधी : –
सध्याच्या इंटरनेट, नव तंत्रज्ञान आणि सोशल माध्यमांच्या युवा विविध क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत. त्यानुसार बँकिंग क्षेत्रातही नवनवीन बदल होत आहेत. त्यानुसार कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेनेही (Karad merchant) आपल्या ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी. सेवा उपलब्ध करुन दिल्या असून आता संस्थेतर्फे ग्राहकांना घर पोहोच बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील (manikrao Patil) यांनी दिली.
येथील कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेची सन 2023-24 या आर्थिक वर्षाची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual meeting) उत्साहात पार पडली. याप्रसंगी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सर्व विषयांना मंजुरी : सभेचे प्रास्ताविक संचालक डॉ. शरद क्षीरसागर यांनी केले. यानंतर विषय पत्रिकेवरील वाचन करण्यात आलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ऐनवेळच्या विषयामध्ये सभासदांनी मांडलेल्या सुचनेनुसार संस्थेच्या शेअर्सची रक्कम 2500 करण्याची मांडलेली सूचनाही सर्वानुमते मंजुर करण्यात आली.
एन.पी.ए. शुन्य टक्के राखण्यात यश : उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील यांनी संस्थेने नुकत्याच संपलेल्या सन 2023-24 या अर्थिक वर्षात गत वर्षीच्या तुलनेत ठेव व कर्जात 10 टक्के ऐवढी प्रशंसनीय वाढ केली असून संस्थेचा एकत्रित व्यवसाय 775 कोटी झाला असल्याचे सांगितले. चालू वर्षी संस्थेने सर्व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची गुणात्मक वाढ केली आहे. तसेच संस्थेकडे 312 कोटींची कर्जे वितरीत केली असून गत वर्षीच्या तुलनेत वसुली कारवाई व सततचा संपर्क गतिमान ठेवल्याने नक्त एन.पी.ए शुन्य टक्के राखण्यात यश मिळविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभासदांच्या विश्वासाची गुंतवणूक : संस्थेचे सभासदांनी नेहमीच संस्थेवर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाची गुंतवणुकीचे प्रतिक म्हणजेच संस्थेच्या ठेवी 463 कोटींच्या झाल्या असल्याचे त्यांनी एवढी नमूद केले.
13.45 कोटींचा ढोबळ नफा : संस्थेला 13 कोटी 45 लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. संस्थेचे कामकाज विविध 27 शाखांतून सुरु असून 19 शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत असल्याचे सांगत सभासदांना 11 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची गोष्ट नाही चेअरमन माणिकराव पाटील यांनी केली.
व्याजदर योजनांचा लाभ घ्या : चालू वर्षी संस्थेने वाहन तारण कर्जास विशेष 9 टक्के व्याज दराची योजना सुरु केली आहे. तसेच ठेवींमध्ये 21 महिन्यांला 9.10 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 575 दिवसांला 10.10 टक्के विशेष व्याज दर लागू करण्यात आले आहेत. त्याचाही सर्व ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन यांनी यावेळी केले.
वर्षभर विविध उपक्रम : संस्थेत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये 8 मार्चला महिला दिन, 1 ऑक्टोंबरला ज्येष्ठ नागरिक दिन, 14 नोव्हेंबरला बालदिन साजरे केले जातात. त्याचाही सभासदांनी फायदा घ्यावा. तसेच ग्राहकांना बँकिंग सेवा घर पोहोच देणार असून त्याचाही सर्व सभासदांनी लाभ घ्यावा.
सभासद कल्याण निधी योजना : सभासदांसाठी सभासद कल्याण निधी योजना सुरु असून त्यात एकच वेळ 5 हजार रूपये भरल्यानंतर पन्नास हजारांपर्यंत मिळणाऱ्या वैद्यकीय उपचारांसाठीच्या अनुदानाचाही लाभ घ्यावा.
लवकरच 1000 कोटींचा टप्पा पुर्ण करू : संस्थेची 500 कोटी ठेवींच्या पुर्णत्वाकडे वाटचाल सुरु असून त्यात सभासदांनी भाग घ्यावा, असे आवाहन करत संस्थेच्या ठेवी कशा वाढतील, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावेत. तसेच सभासदांच्या पाठिंब्यावर लवकरच संस्था 1000 कोटींच्या एकत्र व्यवसायाचा टप्पा पुर्ण करेल, असा विश्वासही संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
संस्थेची सामाजिक बांधिलकी : संस्था फक्त बँकिंग व्यवसाय करणे किंवा नफा कमविणे हा उद्देश ठेवत नसून निभवत असलेल्या सामाजिक बांधिलकी बाबत बोलताना संस्थेचे संस्थापक सत्यनारायण मिणीयार म्हणाले, चालू अर्थिक वर्षात संस्थेने नेहम प्रमाणे मर्चंट समुहाच्या वतीने सामजिक बांधिलकीचे भान जपत कराडच्या माधवराव जाधव बाल सुधारगृहात (रिमांड होम) गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी 11 लाख रुपयांतून दोन शालेय वर्गांचे बांधकाम करुन देण्याचे काम केले आहे. तसेच कराडनगरीच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या लिबर्टी मजदुर व्यायाम मंडळाला 7 लाख 51 हजार रुपयांची देणगी व्यायामाचे साहित्य व क्रिडा विकासासाठी देण्यात आले आहे. तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या लोकांची वर्ष टाळण्यासाठी बसण्याचे एअर पोर्ट खुर्च्यांचे संच व सुशोभीकरणाचे साहित्य देण्यात आले आहे. तसेच दि. 1 जुलै रोजी जागतिक कृषी दिन व आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या जयंतीच्या अवचित त्याने रिमांड होम येथे प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले असून संस्थेच्या सर्व शाखांमधूनही वृक्षारोपण करण्यात आले आले असल्याचे सांगत ज्येष्ठ सभासदांनी संस्थेच्या योजनाचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान : संस्थेच्या कार्यक्षेत्रातील विक्रम उत्पादन घेतलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांमधून एकरी 20 ते 25 टन आले पिकाचे उत्पादन घेणारे शंतनु प्रल्हाद जाधव (पुसेगाव), पाच एकरामध्ये तब्बल 155 गाडी आले घेणारे शिवानंद किसन गायकवाड (वाठार किरोली), 20 गुंठ्यात 68 टन ऊस उत्पादन घेणारे युवराज वसंतराव पाटील (हेळगाव) यांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : सभेस संबोधताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. तसेच सर्व सेवकांनी विशेष प्रयत्न व चांगले कामकाज केल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप, सर्व संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका सौ. अरुणा चव्हाण यांनी आभार मानले.