शिवसेना प्रणित आनंदयात्री यांच्याकडून धर्मवीर 2 (dharmveer 2) या चित्रपटाचा पहिला शो सर्वांसाठी फ्री ठेवण्यात आला आहे. कराड येथील प्रभात चित्रमंदिरात हा शो फ्री दाखवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय मोहिते यांनी दिली.
धर्मवीर आनंद दिघे (dharmveer Anand dighe) यांच्या जीवनावरील धर्मवीर या (dharmveer) चित्रपटाला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर निर्माता, दिग्दर्शकांनी धर्मवीर 2 या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक धर्मवीर व शिवसेना प्रेमींना या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागून राहिली होती. अखेर त्यांची उत्सुकता संपली असून गुरुवारी हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित करण्यात येत आहे.
त्यानूसार शिवसेना प्रणित आनंदयात्री यांच्यातर्फे येथील प्रभात चित्र मंदिरात (Prabhat talkies Karad) गुरुवारी (27 सप्टेंबर) रोजी सकाळी 10 वाजता धर्मवीर 2 या चित्रपटाचा पहिला शो सर्वांसाठी मोफत दाखवण्यात येणार आहे.
दरम्यान, सकाळी कराड शहरातून भव्य बाईक व रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला चौकातून प्रारंभ होणार असून त्यानंतर ही रॅली विजय दिवस चौक, कृष्णा नाका, मुख्य पेठलाईन, यशवंत हायस्कूल मार्गे पुन्हा प्रभात टॉकीज जवळ आल्यानंतर येथे रॅलीची सांगता करण्यात येणार आहे. तरी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच धर्मवीर 2 हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावा, असे आवाहन अक्षय मोहिते यांनी केले आहे.