धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा 14 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
याप्रसंगी जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी, कारखान्याचे इलेक्ट्रिक इंजिनिअर युवराज पिसाळ आणि त्यांच्या पत्नी सौ. स्मिता पिसाळ यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
यावेळी ‘जयवंत शुगर्स’चे डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) व्ही. आर. सावरीकर, जनरल मॅनेजर (टेक्निकल) आर. आर. इजाते, चिफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, इ.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, एच. आर. मॅनेजर एस. एच. भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, डिस्टीलरी इनचार्ज व्ही. जी. म्हसवडे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिद, केनयार्ड सुपरवायझर ए. एम. गोरे, एस. एम. सोमदे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.