Edition

महाकाली विकास सेवा सोसायटीचा ‘आनंदराव पाटील’ यांच्या नावाला कौल

Share करें

✓ Link copy हो गया!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा बँक निवडणुकीसाठी बहुमताने ठराव मंजूर; सहकार व शेतकरी हिताच्या कार्याची घेतली दखल

कराड/प्रतिनिधी : –

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयनगर येथील महाकाली विकास सेवा सोसायटी लि.च्या सभेत आनंदराव पाटील (नाना) यांच्या नावाला बहुमताने पसंती देत ठराव मंजूर करण्यात आला. चेअरमन, व्हाइस चेअरमन, तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णयामुळे आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वावर सोसायटीने विश्वास व्यक्त केला आहे.

सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य, तसेच शेतकरी हितासाठी घेतलेली भूमिका यांचा विचार करून त्यांच्या नावाने हा ठराव मंजूर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व सभासदांनी आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

सभेस सोसायटीचे चेअरमन नवनाथ यादव, व्हाइस चेअरमन शिवाजीराव जाधव, विश्वासराव पाटील, भरत संकपाळ, दगडू यादव, शशिकांत कुमठेकर, धनंजय शीलवंत, सौ. अलका पाटील, सचिव जहीर मुल्ला यांच्यासह मुंडे गावचे माजी सरपंच आनंदराव जमाले, माजी सरपंच रमेश लवटे, विजयराव कदम, वसंतराव पाटील, दिलीपराव पाटील, नागेंद्र कोरे, माजी सरपंच संजय शीलवंत, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हाइस चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail