राष्ट्रीय - Jan Swarashtra https://janswarashtra.com Latest News | Top News | Breaking News Mon, 23 Jun 2025 17:46:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.2 https://janswarashtra.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Add-a-heading-5-32x32.png राष्ट्रीय - Jan Swarashtra https://janswarashtra.com 32 32 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ काळ्या रानकुत्र्याची नोंद https://janswarashtra.com/archives/6147 https://janswarashtra.com/archives/6147#respond Mon, 23 Jun 2025 17:44:15 +0000 https://janswarashtra.com/?p=6147 दिग्विजय पाटील यांच्या कॅमेऱ्यात कैद; वन विभाग सतर्क, अभ्यासासाठी कॅमेरा ट्रॅप कराड/प्रतिनिधी : – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील जंगलात एका अत्यंत दुर्मिळ अशा काळ्या रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक) नोंद झाली असून, या घटनेने जैवविविधतेच्या दृष्टीने मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील हे जंगल सफरीसाठी गेले असता त्यांना पूर्णतः काळ्या रंगाचा रानकुत्रा दिसून ... Read more

The post सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ काळ्या रानकुत्र्याची नोंद first appeared on Jan Swarashtra.

]]>
दिग्विजय पाटील यांच्या कॅमेऱ्यात कैद; वन विभाग सतर्क, अभ्यासासाठी कॅमेरा ट्रॅप

कराड/प्रतिनिधी : –

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील जंगलात एका अत्यंत दुर्मिळ अशा काळ्या रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक) नोंद झाली असून, या घटनेने जैवविविधतेच्या दृष्टीने मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील हे जंगल सफरीसाठी गेले असता त्यांना पूर्णतः काळ्या रंगाचा रानकुत्रा दिसून आला. त्यांनी तो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपून लगेचच मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना याबाबत माहिती दिली.

८८ वर्षांनी अशा दुर्मिळ प्राण्याचे दर्शन : ही नोंद दुर्मिळ समजली जात असून, वन विभागाच्या अभिलेखानुसार यापूर्वी १९३६ मध्ये तमिळनाडूमधील कोइम्बतूर येथे स्कॉट्समॅन आणि निसर्गशास्त्रज्ञ आर. सी. मॉरिस यांनी अशाच प्रकारच्या काळ्या रानकुत्र्याची नोंद केली होती. जवळपास ८८ वर्षांनी अशा दुर्मिळ प्राण्याचे दर्शन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाले आहे.

कोळशिंदा : रानकुत्रा किंवा कोळशिंदा (शास्त्रीय नाव : Cuon alpinus) सामान्यतः तांबूस लालसर रंगाचा असतो. मात्र, मेलेनिस्टिक या जैविक स्थितीमुळे त्याच्या शरीरात मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्य प्रमाण निर्माण होते, ज्यामुळे तो पूर्णतः काळा दिसतो. ही स्थिती सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांच्यात आढळते आणि ती अनुवांशिक स्वरूपाची असते.

व्याघ्र प्रकल्प बफर झोन : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिसलेला काळा रानकुत्रा. (छायाचित्रे : दिग्विजय पाटील, कराड).

वैशिष्ट्ये : या जातीच्या रानकुत्र्याची उंची ४३ ते ४५ सें.मी., शरीराची लांबी सुमारे ३ फूट, नराचे वजन सुमारे २० किलो, मादीचे थोडे कमी, कळपात राहून सामूहिक शिकार करणारा शिकारी प्राणी, मुख्यतः हरीणवर्गीय प्राण्यांची शिकार करणारा अशी वैशिष्ट्ये आहेत. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पिल्लांचा जन्म; मादी एका वेळी ४ ते ६ पिल्लांना जन्म देते.

कॅमेरा ट्रॅप लावण्याचे आदेश : दिग्विजय पाटील यांनी टिपलेल्या छायाचित्रामुळे वन विभाग सतर्क झाला असून, विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी संबंधित भागात कॅमेरा ट्रॅप लावण्याचे आदेश वनरक्षकांना दिले आहेत. यामुळे या दुर्मिळ रानकुत्र्याच्या हालचालींचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.

“मेलेनिस्टिक म्हणजे शरीरात मेलेनिनचे प्रमाण जास्त असल्याने प्राणी काळसर दिसतो. यापूर्वी सह्याद्रीत काळा बिबट्याही नोंदवला गेला होता. आता काळा रानकुत्राही आढळल्याने या प्रकल्पातील जैवविविधतेचे आणखी एक दुर्मिळ रूप समोर आले आहे,”

– रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक) 

The post सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ काळ्या रानकुत्र्याची नोंद first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6147/feed 0
मालमत्ता करावरील शास्ती माफ करा https://janswarashtra.com/archives/6097 https://janswarashtra.com/archives/6097#respond Thu, 19 Jun 2025 17:47:11 +0000 https://janswarashtra.com/?p=6097 भाजपकडून मलकापूर नगरपालिका प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी कराड/प्रतिनिधी : –  महाराष्ट्र शासनाने 19 मे 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नगरपालिका क्षेत्रातील थकित मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मलकापूर शहरातील नागरिकांना मिळावा, अशी मागणी कराड दक्षिण भारतीय जनता पक्षाच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन : ... Read more

The post मालमत्ता करावरील शास्ती माफ करा first appeared on Jan Swarashtra.

]]>

भाजपकडून मलकापूर नगरपालिका प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र शासनाने 19 मे 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नगरपालिका क्षेत्रातील थकित मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मलकापूर शहरातील नागरिकांना मिळावा, अशी मागणी कराड दक्षिण भारतीय जनता पक्षाच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन : भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी भाजप कराड दक्षिण मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, माजी विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव, तानाजी देशमुख, भारत जंञे, सुरज शेवाळे, नगरसेवक शहाजी पाटील, दिनेश रैनाक, राजू मुल्ला, प्रशांत चांदे, कान्हा लाखे, प्रशांत गावडे, सूर्यकांत खिलारे, संतोष हिंगसे, नंदकुमार बागल, विजेंद्र जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अनेक मिळकतधारक कर भरण्यात असमर्थ : महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी  अधिनियम 1965 च्या कलम 150(अ)(1) नुसार थकित मालमत्ता करावर दरमहा 2 टक्के शास्ती आकारली जाते. आर्थिक अडचणीमुळे अनेक मिळकतधारक कर भरण्यात असमर्थ असल्याने थकबाकीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे करवसुलीवर प्रतिकूल परिणाम होतो.

‘अभय योजना’ : यावर उपाययोजना म्हणून शासनाने ‘अभय योजना’ जाहीर केली असून, त्यानुसार 19 मे 2025 पर्यंत थकित असलेल्या मिळकतधारकांची शास्ती अंशतः किंवा पूर्णतः माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि नागरिकांना याचा लाभ घेता यावा, यासाठी मलकापूर पालिकेमार्फत शहरात व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मिळकतधारकांनी थकबाकी भरावी : पालिका कार्यक्षेत्रातील सर्व मिळकतधारकांनी ही संधी साधून आपली थकबाकी भरावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

The post मालमत्ता करावरील शास्ती माफ करा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/6097/feed 0
संस्कृती, देवत्व मिळवण्यासाठी गोमातेचे संगोपन करा https://janswarashtra.com/archives/5417 https://janswarashtra.com/archives/5417#respond Tue, 29 Apr 2025 15:22:26 +0000 https://janswarashtra.com/?p=5417 शेतीमित्र अरुण पाटील; ‘गो संवर्धन व पर्यावरण रक्षणा’वर व्याख्यान कराड/प्रतिनिधी : – पाच-दहा हजार वर्षांपूर्वी अठरा महर्षींनी आपल्याला पहिली धार्मिक, सांस्कृतिक आचारसंहिता घालून दिली. गाय उभी, तिथे तीर्थक्षेत्र उभा राहते, हे सांगितले. परंतु, ऋषीमुनींनी सांगितलेली संकल्पना आपण विसरलो. पाश्चात्य संस्कृतीला भुलून दुःख, विकलांगता, मनोरुग्ण व विविध आजारांना कवटाळले. आपली संस्कृती सोडल्यामुळे देवत्व गेले आहे. ते ... Read more

The post संस्कृती, देवत्व मिळवण्यासाठी गोमातेचे संगोपन करा first appeared on Jan Swarashtra.

]]>

शेतीमित्र अरुण पाटील; ‘गो संवर्धन व पर्यावरण रक्षणा’वर व्याख्यान

कराड/प्रतिनिधी : –

पाच-दहा हजार वर्षांपूर्वी अठरा महर्षींनी आपल्याला पहिली धार्मिक, सांस्कृतिक आचारसंहिता घालून दिली. गाय उभी, तिथे तीर्थक्षेत्र उभा राहते, हे सांगितले. परंतु, ऋषीमुनींनी सांगितलेली संकल्पना आपण विसरलो. पाश्चात्य संस्कृतीला भुलून दुःख, विकलांगता, मनोरुग्ण व विविध आजारांना कवटाळले. आपली संस्कृती सोडल्यामुळे देवत्व गेले आहे. ते परत मिळवण्यासाठी घरोघरी गोमातेचे पालन, संगोपन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेतीमित्र, गोतज्ञ अरुण पाटील यांनी केले.

व्याख्यान : श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट, कराडतर्फे शिवजयंतीनिमित्त ‘भारतीय संस्कृतीचा केंद्रबिंदू – देशी गाय, मानवी आरोग्य व संपुर्ण पर्यावरण रक्षण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, संस्थेचे अध्यक्ष सुनील पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कराड : ‘गो संवर्धन व पर्यावरण रक्षणाबाबत मार्गदर्शन करताना शेतीमित्र, गोतज्ञ अरुण पाटील, समवेत मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज.

त्यातून विषारी कण पोटात जातात : जागतिक बाजारपेठेत ४५ टक्के कृषी उत्पादन एकट्या भारताचे होते. मात्र, आज आपल्या शेतीची अवस्था बिकट झाली असल्याचे सांगत श्री. पाटील म्हणाले, हरियाणातील गहू, तांदळातून विषारी कण आपल्या पोटात जातात, हे संशोधनातून समोर आले आहे. पिकांवरील विषारी औषधांच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढलेय.

नदी अपवित्र करण्याचे पाप केले : नदी आणि गाईला माता मानणाऱ्या आपल्या संस्कृतीला आपण विसरत चाललोय. गंगा नदीच्या पाण्यातील जैवविविधता जगातील कोणत्याही नदीच्या पाण्यात आढळत नाही. मात्र, हीच नदी अपवित्र करण्याचे पाप आपण केले असल्याचे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले.

अपत्याचा बुद्धांश कमी होतो : मनःशांती आणि शीघ्र विचारशक्ती ठेवण्यासाठी पाणी शुद्ध ठेवायला हवे, असे सांगत श्री. पाटील म्हणाले, तिथी, वार, नक्षत्र, चरण यांनुसार झाडात वेगवेगळे प्रथिने तयार होतात. म्हणून वडाला प्रदक्षिणा घालण्यास संस्कृती सांगते. आज ६५ टक्के स्त्रियांचे सिजर करावे लागते. यावेळी दिलेल्या इंजेक्शनमुळे अपत्याचा दहा टक्के बुद्धांश कमी होत असल्याचे पाश्चात्य संशोधनातून समोर आले आहे.

प्रयोग हेच जीवन : संस्कृतीचा आधार घेऊन आरोग्य निरोगी राखायला हवे. निसर्गाचा आनंद घेऊन जो जगाला, तो आनंदी. खोपीत रहा, पण समाधानाने रहा. शेती श्रद्धेवर अवलंबून असते. शेती विकसित करण्याचे तंत्र पराशर मुनींनी सर्वप्रथम मांडले. प्रयोग हेच जीवन म्हणून जगायला शिका, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

‘ज्याच्या घरी गाय, तिथे विठ्ठलाचे पाय’ : ‘ज्याच्या घरी गाय, तिथे विठ्ठलाचे पाय’ या तुकाराम महाराजांच्या चरणाचा आधार घेत श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक घरात गोमातेचे पालन होणे गरजेचे आहे. गाईंमुळे २३ टक्के ऑक्सिजन मिळतो. तिच्या शेणात ३० टक्के, तर वाळलेल्या शेणात ४५ टक्के ऑक्सिजन असतो. गाईच्या शेणाचा सडा अंगणात मारल्याने अल्ट्रानील किरणे सहा फुटांवरून परावर्तीत होतात.

गोमुत्राचे महत्त्व : गोमुत्राच्या गंध लहरींमुळे बुद्धिमत्ता वाढते. गोमूत्र कीडनाशक असून त्यातून १६ अन्नद्रव्य पिकाला मिळतात. दररोज ४५ मिली गोमूत्र प्राशन करावे. कॅन्सरपासून वाचण्यासाठी गोमुत्राशिवाय पर्याय नाही, जगाने मान्य केले आहे. गोमूत्र कोलेस्ट्रॉल जाळून टाकते. गाईचे दूध, दही, ताक, तूप अत्यंत औषधी आहे. मात्र, विज्ञानाने आपण अधोगतीला गेलो. गाय घराघरात जावी, शेतीचे, घराचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी गाईचे पालन, संगोपन करणे गरजेचे असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

कराड : मनोगत व्यक्त करताना जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज.

आपण षंडासारखे गप्प! : हिंदूंवर, गाईंवर हल्ले होताना आपण षंडासारखे गप्प आहोत, असे सांगत मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले, आज अतिरेकी हल्ल्यांपेक्षा आपल्याच धर्म आणि संस्कृतीला नावे ठेवणारेच खरे अतिरेकी आहेत. अनेकजण दानधर्म करतात. परंतु, गोपालन सारख्या संस्थेला मदत करताना लोक कुचराई करतात. त्यामुळे मदत कुठे करावी, हेही कळायला हवे.

खाण्यातूनच विषप्राशन : सणासुदीला पुजायलाही गाय, बैल मिळणार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे सांगत महाराज म्हणाले, आपण आपल्या खाण्यातूनच विष प्राशन करतोय. १०० लोकांपाठीमागे दहा जण कॅन्सरने ग्रस्त आहेत, हे त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या आपला शेतकरी चांगल्या पद्धतीने उभा करायला हवा, गोशाळेचा सहकार्य करायला हवे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संस्थेच्या कार्याचा आढावा : प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सुनील पावसकर यांनी प्रत्येकाच्या घरी गाय असावी, याबाबत जागृतता निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. १९१५ पासून या जागेवर गोशाला आहे. मात्र, जागेचे आर्थिक महत्व पाहून काहींची या जागेवर वक्रदृष्टी पडली. सदर जागा विकल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही गोशाला वाचवण्यासाठी लढा उभारला. यामध्ये सर्वसामान्य गो प्रेमी, नागरिक आमच्या पाठीमागे उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले.

सहकार्य : सूत्रसंचालन मदन सावंत यांनी केले. सौ. ज्योती दंडवते यांनी आभार मानले. संपूर्ण वंदे मातरम् होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कडणे, सुरेंद्र भस्मे, संजीव शहा, महेश उर्फ पप्पु कुष्टे, गीता सूर्यवंशी, पांडुरंग चव्हाण यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास गोप्रेमी, शिवप्रेमी, पर्यावरणप्रेमी युवक, युवती, महिला, नागरिक उपस्थित होते.

गोरक्षण संस्थेच्या मागे हिंदुंनीच फेरा लावलाय

कराडची गोरक्षण संस्था शंभर वर्षांहून जुनी आहे. इथे गाईचे पालन, पोषण केले जाते. याला गोप्रेमी, नागरिकांचा हातभार आहे. मात्र, या संस्थेच्या मागे लागलेला फेरा हिंदुंनीच लावला आहे, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही. मनुष्यच मनुष्याचा वैरी बनत चाललाय. मात्र, श्री गोरक्षण ट्रस्ट संस्थेला त्यांच्या जागेवरून कोणीही हटवू शकत नाही. प्रसंगी आम्ही जीवाची बाजी लावू. अशा कुप्रवृत्तीला गोप्रेमी, पर्यावरण प्रेमी, नागरिकांनीही खंबीरपणे विरोध करायला हवा, असे आवाहन मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी केले.

The post संस्कृती, देवत्व मिळवण्यासाठी गोमातेचे संगोपन करा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5417/feed 0
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली https://janswarashtra.com/archives/5379 https://janswarashtra.com/archives/5379#respond Sat, 26 Apr 2025 05:04:26 +0000 https://janswarashtra.com/?p=5379 दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली कराड/प्रतिनिधी : –  पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी प्रीतिसंगम घाटावर आदरांजली वाहण्यात येणार आहे. वेळ व ठिकाण : या हल्ल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या भ्याड हल्याच्या निषेधार्थ विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजता प्रीतिसंगम ... Read more

The post दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली first appeared on Jan Swarashtra.

]]>

दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली

कराड/प्रतिनिधी : – 

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी प्रीतिसंगम घाटावर आदरांजली वाहण्यात येणार आहे.

वेळ व ठिकाण : या हल्ल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या भ्याड हल्याच्या निषेधार्थ विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रविवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजता प्रीतिसंगम घाटावर मेणबत्या प्रज्वलीत करुन हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

आवाहन : कराड शहर व परिसरातील सर्व आबालवृध्दांनी या भ्याड हल्याच्या निषेधार्थ आयोजित आदरांजली कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन विजय दिवस समारोह समितीच्यावतीने अध्यक्ष निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांनी केले आहे.

The post दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार आदरांजली first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5379/feed 0
भाजपा सदस्य नोंदणीत कराड दक्षिणची बाजी  https://janswarashtra.com/archives/5374 https://janswarashtra.com/archives/5374#respond Sat, 26 Apr 2025 04:59:05 +0000 https://janswarashtra.com/?p=5374 आ. डॉ. अतुल भोसले; गाव चलो,  वस्ती चलो अभियान व संघटनपर्व आढावा बैठक कराड/प्रतिनिधी : –  भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देश व राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. या अभियानामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्राथमिक सदस्यांची नोंद ८२, ६४५ इतकी झाली आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील २६ विधानसभा मतदारसंघाचा विचार करता ... Read more

The post भाजपा सदस्य नोंदणीत कराड दक्षिणची बाजी  first appeared on Jan Swarashtra.

]]>

आ. डॉ. अतुल भोसले; गाव चलो,  वस्ती चलो अभियान व संघटनपर्व आढावा बैठक

कराड/प्रतिनिधी : – 

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देश व राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. या अभियानामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्राथमिक सदस्यांची नोंद ८२, ६४५ इतकी झाली आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील २६ विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या सगळ्यामध्ये कराड दक्षिणने अतिशय चांगले काम केले असून यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने बाजी मारली असल्याचे मत आ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.

अभियान व आढावा बैठक : भाजप पश्चिम महाराष्ट्र विभाग ‘गाव चलो, वस्ती चलो अभियान’ व संघटनपर्व आढावा बैठक कराड येथे उत्साहात पार पडली. याप्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : या बैठकीस भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे यांच्यासह बहुसंख्य भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

प्राथमिक सदस्य नोंदणी : सदर अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना आ. अतुल भोसले म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ८२, ६४५ इतकी प्राथमिक सदस्यांची नोंद झाली आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. विशेषतः मतदारसंघातील ३४२ बूथ समित्या पूर्ण आहेत. त्यामुळे पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी आम्ही योग्यरित्या पार पाडली असल्याचे आ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट आहे.

कराड दक्षिण काँग्रेसमुक्त करू

भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मुक्तचा नारा दिला आहे. तोच नारा आम्ही मतदारसंघामध्ये दिला असून काँग्रेसमुक्त कराड दक्षिण प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वजण एकदिलाने प्रयत्न करीत आहोत. या मतदारसंघातील काँग्रेसची सगळी रचना आम्ही मोडून काढण्याचे काम करून ते गोडाऊन ठेवले असल्याची बोचरी टीकाही आ. भोसले यांनी यावेळी केली. 

चांगली भूमिका बजावणाऱ्यांना मोठी संधी

भारतीय जनता पार्टीने राबवलेल्या सदस्य नोंदणी अभियानात कराड दक्षिणची कामगिरी कौतुकास्पद आहेच. परंतु, यामाध्यमातून पक्षवाढीत जे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगली भूमिका बजावतील. त्यांना नक्कीच भविष्यात मोठी संधी दिली जाईल, अशी ग्वाही देखील आ. भोसले यांनी याप्रसंगी दिली. 

The post भाजपा सदस्य नोंदणीत कराड दक्षिणची बाजी  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5374/feed 0
काश्मीरमध्ये अडकलेल्यांचा परतीचा मार्ग सुकर https://janswarashtra.com/archives/5370 https://janswarashtra.com/archives/5370#respond Sat, 26 Apr 2025 04:49:28 +0000 https://janswarashtra.com/?p=5370 आ. डॉ. अतुल भोसलेंकडून तिकिटाची व्यवस्था; शनिवारी रात्री परतणार पर्यटक कराड/प्रतिनिधी : –  काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या आणि अतिरेकी हल्ल्यामुळे तिथेच अडकून पडलेल्या कराड व सातारा येथील ७ पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी कराड दक्षिणचे आ. डॉ. अतुल भोसले पुढे सरसावले आहेत. त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सातही प्रवाशांच्या विमान व रेल्वे तिकिटांची व्यवस्था केल्याने, ... Read more

The post काश्मीरमध्ये अडकलेल्यांचा परतीचा मार्ग सुकर first appeared on Jan Swarashtra.

]]>

आ. डॉ. अतुल भोसलेंकडून तिकिटाची व्यवस्था; शनिवारी रात्री परतणार पर्यटक

कराड/प्रतिनिधी : – 

काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या आणि अतिरेकी हल्ल्यामुळे तिथेच अडकून पडलेल्या कराड व सातारा येथील ७ पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी कराड दक्षिणचे आ. डॉ. अतुल भोसले पुढे सरसावले आहेत. त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सातही प्रवाशांच्या विमान व रेल्वे तिकिटांची व्यवस्था केल्याने, हे पर्यटक शनिवारी (दि. २६) रात्री उशिरा कराडमध्ये सुखरुप परतणार आहेत.

कराडकरांचा समावेश : कराडमधील इंटेरियर डिझायनर महेश मिलिंद कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासमवेत काश्मीरला पर्यटनाला गेले होते. त्यांच्यासमवेत माधवी मिलिंद कुलकर्णी, श्रीधर शामराव क्षीरसागर, वर्षा श्रीधर क्षीरसागर, सुखदा श्रीधर क्षीरसागर हे कराडचे रहिवाशी; तर शरद हरिभाऊ पवार व विद्या शरद पवार हे सातारचे दोघे पर्यटक होते.

अतिरेक्यांचा भ्याड हल्ला : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी जेव्हा भ्याड हल्ला केला, तेव्हा हे पर्यटक गुलमर्गमध्ये होते. त्यानंतर ते तातडीने श्रीनगरमध्ये निवासाच्या ठिकाणी पोहचले.

गावी जाण्यासाठी हालचाल : या अतिरेकी हल्ल्यामुळे सर्वत्रच घबराटीचे वातावरण पसरल्याने पर्यटकांनी पुन्हा आपापल्या गावी जाण्यासाठी हालचाल सुरु केली.

फोनवरुन प्रत्यक्ष संपर्क : कराड व सातारा येथील हे पर्यटक श्रीनगरमध्ये अडकल्याचे समजताच आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी बुधवार (दि. २३) त्यांच्याशी फोनवरुन प्रत्यक्ष संपर्क साधला.

पर्यटकांना दिलासा : यावेळी त्यांना आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उड्डाण वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करत, तिकिटांची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या सर्व पर्यटकांना दिलासा मिळाला.

सुखरुप आणण्यासाठी प्रयत्न : या पर्यटकांना लवकरात लवकर कराडला सुखरुप आणण्यासाठी आ. डॉ. भोसले यांनी सर्व पातळ्यांवर आपले प्रयत्न सुरु ठेवले.

विमान व रेल्वे तिकिट व्यवस्था : आ. डॉ. भोसले यांनी गुरुवार (दि. २४) सायंकाळी खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सातही प्रवाशांसाठी श्रीनगर ते दिल्ली विमान प्रवास आणि दिल्ली ते कराड असे रेल्वे प्रवासाच्या तिकिटांची व्यवस्था केली.

दर्शन एक्सप्रेस : शुक्रवार (दि. २५) श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने हे सातही पर्यटक दुपारी दीडच्या सुमारास दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरुप पोहचले. तिथून पुढे दर्शन एक्सप्रेसने हे सर्व पर्यटक शनिवारी (दि. २६) रात्री उशिरा कराड येथे पोहचणार आहेत.

खासदार, आमदारांचे आभार : आ. डॉ. अतुल भोसले यांनी तातडीने विमान व रेल्वे तिकिटांची व्यवस्था केल्याने या पर्यटकांकडून समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांनी खा. उदयनराजे भोसले व आ. डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले आहेत.

The post काश्मीरमध्ये अडकलेल्यांचा परतीचा मार्ग सुकर first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5370/feed 0
पृथ्वीराज चव्हाणांनी थेट परराष्ट्र सचिवांना केला फोन https://janswarashtra.com/archives/5359 https://janswarashtra.com/archives/5359#respond Thu, 24 Apr 2025 12:29:54 +0000 https://janswarashtra.com/?p=5359 श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी – पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी कराड/प्रतिनिधी : – जम्मू काश्मीरमध्ये कराड व सातारा येथील पर्यटक अडकल्या माहिती मिळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची थेट त्यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच याप्रश्नी थेट परराष्ट्र सचिवांना फोन करून जम्मू काश्मीरमधील पहलगाम, श्रीनगर येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांना ... Read more

The post पृथ्वीराज चव्हाणांनी थेट परराष्ट्र सचिवांना केला फोन first appeared on Jan Swarashtra.

]]>
श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी – पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

कराड/प्रतिनिधी : –

जम्मू काश्मीरमध्ये कराड व सातारा येथील पर्यटक अडकल्या माहिती मिळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची थेट त्यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच याप्रश्नी थेट परराष्ट्र सचिवांना फोन करून जम्मू काश्मीरमधील पहलगाम, श्रीनगर येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांना सुखरूप मुंबईला पोहोचावाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणीही केली आहे.

कराडचे पर्यटक अडकले : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ ते ३० पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये कराड व साताराचे सुद्धा पर्यटक अडकले असून त्यामध्ये कराडच्या पाच पर्यटकांचा समावेश आहे.

महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क : कराडचे पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे पर्यटक महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्याच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी अजूनही कराडचे पर्यटक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती श्री. कुलकर्णी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. यावेळी पृथ्वीराज बाबांनी श्री. कुलकर्णी यांना आधार देत संयम ठेवण्याची विनंती केली.

कराडला सुरक्षित पोहचण्यासाठी प्रयत्न : तुम्हाला मदत नक्की मिळेल. तुम्ही लवकरात लवकर कराडला पोहचाल, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन पृथ्वीराजबाबांनी दिले.

पर्यटकांची यादी पाठवली : श्री. कुलकर्णी यांच्या सोबत बोलणे झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ परराष्ट्र सचिव व महाराष्ट्राच्या सचिवांशी संपर्क साधून कराडसह महाराष्ट्रातील सुद्धा पर्यटकांना लवकरात लवकर आणण्यासाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी केली. प्रशासनाने जलद यंत्रणा कामाला लावावी, असे सांगून कराड व सातारामधील अडकलेल्या पर्यटकांची यादी सचिवांना पाठवली आहे.

दिल्लीत राहण्याची व्यवस्था : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महेश कुलकर्णी यांना संपर्क करून माहिती दिली. अगदी डायरेक्ट पुणे किंवा मुंबईपर्यंत जरी व्यवस्था नाही झाली, तरी दिल्लीपर्यंत तरी या. तुमच्या सर्वांची राहण्याची व्यवस्था दिल्लीत केली जाईल, असा आधारही पृथ्वीराजबाबांनी कराडच्या कुलकर्णी व क्षीरसागर कुटुंबियांना दिला आहे.

The post पृथ्वीराज चव्हाणांनी थेट परराष्ट्र सचिवांना केला फोन first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5359/feed 0
कराडमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा https://janswarashtra.com/archives/5047 https://janswarashtra.com/archives/5047#respond Sun, 06 Apr 2025 16:32:02 +0000 https://janswarashtra.com/?p=5047 कराड/प्रतिनिधी : – येथील आर्ट ऑफ लिविंग यांनी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन या ठिकाणी सोमवार (दि. ७) एप्रिल रोजी सकाळी ९ वा. सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवलिंगाचे दर्शन : सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये भाविक, भक्त व नागरिकांसाठी शिवलिंगाचे दर्शन खुले करण्यात येणार आहे. शिवलिंगाची १००० वर्ष पूजा : सोमनाथ मंदिरावरती १००० ... Read more

The post कराडमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा first appeared on Jan Swarashtra.

]]>
कराड/प्रतिनिधी : –

येथील आर्ट ऑफ लिविंग यांनी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन या ठिकाणी सोमवार (दि. ७) एप्रिल रोजी सकाळी ९ वा. सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवलिंगाचे दर्शन : सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये भाविक, भक्त व नागरिकांसाठी शिवलिंगाचे दर्शन खुले करण्यात येणार आहे.

शिवलिंगाची १००० वर्ष पूजा : सोमनाथ मंदिरावरती १००० वर्षांपूर्वी प्रहार करुन येथील शिवलिंग तोडले होते. त्यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहोत्री संत यांनी जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन १००० वर्ष पूजा केली. त्यावेळी कांचीचे परमाचार्य यांनी सांगितले की, हे १००० वर्षे बाहेर काढू नका.

महाशिवरात्रीला रुद्राभिषेक : १००० वर्षांनंतर श्री श्री रविशंकरजींनी यावर्षी महाशिवरात्रीला त्यावरती रुद्राभिषेक केला आणि आता गुरुदेव जिथे जात आहेत, तिथे रुद्राभिषेक होत आहे.

दुर्मिळ संधीचा लाभ घ्या : तेच सोमनाथ शिवलिंग कराडमध्ये येत आहे. आज सोमवार (दि. ७) एप्रिल रोजी सकाळी ९ वा. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन या ठिकाणी हे सोमनाथ शिवलिंग दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून या दुर्मिळ संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

The post कराडमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/5047/feed 0
महाराष्ट्रातील अराजकतेला मुख्यमंत्री जबाबदार https://janswarashtra.com/archives/4896 https://janswarashtra.com/archives/4896#respond Tue, 01 Apr 2025 04:07:16 +0000 https://janswarashtra.com/?p=4896 पृथ्वीराज चव्हाण; ट्रम्प सरकारपुढे केंद्र सरकारचे लोटांगण कराड/प्रतिनिधी : – देशात किंबहुना महाराष्ट्रात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती झाली नाही, राज्याला जीएसटीचा परतावा मिळाला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली, लाडकी बहीण योजनेचे हप्ते द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. याउलट राज्यात जातीय दंगली घडवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे केंद्र सरकारच्या आश्रयाने चालले ... Read more

The post महाराष्ट्रातील अराजकतेला मुख्यमंत्री जबाबदार first appeared on Jan Swarashtra.

]]>
पृथ्वीराज चव्हाण; ट्रम्प सरकारपुढे केंद्र सरकारचे लोटांगण

कराड/प्रतिनिधी : –

देशात किंबहुना महाराष्ट्रात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती झाली नाही, राज्याला जीएसटीचा परतावा मिळाला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली, लाडकी बहीण योजनेचे हप्ते द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. याउलट राज्यात जातीय दंगली घडवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे केंद्र सरकारच्या आश्रयाने चालले असून या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.

महायुतीने घोर निराशा केली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, त्यांची घोर निराशा झाली, असे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचे सांगत दोन दिवसात (३१ मार्चपर्यंत) सर्व कर्ज भरावे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याला जोरात दिला.

…तर कर्जमाफीची गरजच नव्हती : जर सरकारने कापूस आणि सोयाबीनला समर्थन किंमत दिली असती, तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नव्हती, असे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, इतर कोणत्याही गोष्टींच्या किमतीने न वाढवता सरकार शेतकऱ्यांवरच अन्याय करत आहे. राज्य सरकारही केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत आहे, या गोष्टीचा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी जाहीर निषेध नोंदवला.

आश्वासनपूर्तीला हरताळ : शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारर्माफत मिळणारा किसान सन्मान निधी एक हजारावरून दीड हजार करण्याचे भाजपने सांगितले, हे झाले नाही. शेतमालाला किमान हमीभाव मिळाला नाही. लाडकी बहीण योजनेच्या पंधराशेवरून एकवीसशे रुपयांच्या आश्वासनपूर्तीला हरताळ फासला असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

फसवणूक करणाऱ्यांचा जनताच विचार करेल : राज्यावर चाळीस हजार कोटींचे कर्ज असल्याचे महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई सांगतात. मग योजना जाहीर करताना हे माहीत नव्हते का? असा सवाल उपस्थित करत श्री. चव्हाण यांनी सरकारने लोकांना फसवले, आता जनताच त्यांचा विचार करेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

केंद्र सरकार दबावाला बळी पडले : ट्रम्प सरकारच्या दबावाला केंद्र सरकार बळी पडल्याचे सांगताना श्री. चव्हाण म्हणाले, अमेरिकेमध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या ६० लाख लोकांना त्यांनी परत पाठवले. त्यांचा सन्मान राखला नाही. याबाबतच्या धोरणावेळी केंद्र सरकारने त्यांच्यासमोर लोटांगण घातले.

ताठर भूमिका घ्यायला हवी : आता दोन एप्रिल रोजी ट्रम्प सरकार अमेरिकेचे आयात-निर्यात धोरण ठरवणार आहे. यावेळी केंद्र सरकारने ताठर भूमिका घ्यायला हवी. जर यावेळीही केंद्राने त्यांच्यासमोर लोटांगण घातले, तर शेतकऱ्यांची प्रचंड अनास्था होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केल्यास त्याचा महाराष्ट्र सरकारवर मोठा परिणाम होणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

लोकशाही व न्यायव्यवस्थेला काळीमा फासला : मोदींवर निशाणा साधताना श्री. चव्हाण म्हणाले, एका न्यायाधीशाच्या घरात कोट्यावधींची रक्कम सापडते. मात्र, याबाबतची माहिती का लपवली जाते? सामान्य जनतेला एक कायदा आणि न्यायाधीशाला दुसरा असे का? सीबीआयचे अध्यक्ष मोदी आहेत, तर त्यांनी न्यायाधीशांना अटक करण्यापासून का थांबवले? असे सांगून ही लोकशाही आणि न्यायव्यवस्थेला काळीमा फासणारी घटना असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

 

The post महाराष्ट्रातील अराजकतेला मुख्यमंत्री जबाबदार first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/4896/feed 0
पोस्टाच्या लाभदायी सेवा घरोघरी पोहोचविणार  https://janswarashtra.com/archives/4769 https://janswarashtra.com/archives/4769#respond Wed, 19 Mar 2025 17:44:26 +0000 https://janswarashtra.com/?p=4769 डाक अधीक्षक बाळकृष्ण एरंडे; डिजिटल सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा  कराड/प्रतिनिधी : –  भारतीय डाक (पोस्ट) विभागाला मोठा इतिहास आहे. तार, पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र ते स्पीड पोस्ट आणि डिजिटल सेवांपर्यंत पोस्ट खात्याने खात टाकली असून नागरिकांसाठी अनेक दर्जेदार सेवा पुरवत आहे. परंतु, पोस्टाच्या अनेक लाभदायी योजनांबाबत नागरिकांना पुरेशी कल्पना नाही. अशा सर्व योजना आपण घरोघरी ... Read more

The post पोस्टाच्या लाभदायी सेवा घरोघरी पोहोचविणार  first appeared on Jan Swarashtra.

]]>

डाक अधीक्षक बाळकृष्ण एरंडे; डिजिटल सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा 

कराड/प्रतिनिधी : – 

भारतीय डाक (पोस्ट) विभागाला मोठा इतिहास आहे. तार, पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र ते स्पीड पोस्ट आणि डिजिटल सेवांपर्यंत पोस्ट खात्याने खात टाकली असून नागरिकांसाठी अनेक दर्जेदार सेवा पुरवत आहे. परंतु, पोस्टाच्या अनेक लाभदायी योजनांबाबत नागरिकांना पुरेशी कल्पना नाही. अशा सर्व योजना आपण घरोघरी पोहोचविणार असल्याचा निर्धार कराड विभागाचे डाग अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी व्यक्त केला.

कराड : डाक अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांचे स्वागत व सत्कार करताना व्ही. बी. कदम, ए. बी. देशमुख व सी. एम. नदाफ.

पदभार स्वीकारला : कराड विभागाचे नूतन डाग अधीक्षक म्हणून श्री बाळकृष्ण पोपट एरंडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

उपस्थिती : यावेळी सहाय्यक डाक अधीक्षक व्ही. बी. कदम, डाक निरीक्षक ए. बी. देशमुख, डाक निरीक्षक सी. एम. नदाफ प्रामुख्याने उपस्थित होते.

पोस्ट खात्यात काळानुरूप बदल : पोस्टाच्या विविध योजना व अन्य विनम्र सेवा ग्राहकांना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना श्री एरंडे म्हणाले, पोस्ट खात्यात काळानुरूप मोठा बदल झाला आहे. यातील डिजिटल पोस्ट बँक सेवा ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायी आहे. गावोगावच्या पोस्ट मास्तर यांच्याकडे पोस्ट विभागाने डिजिटल मोबाईल घेण्यात आला असून त्या मार्फत विविध सेवा पुरवल्या जातात.

या सुविधांचा समावेश : डिजिटल मोबाईल द्वारे स्पीड पोस्ट, पार्सल व बुकिंग करता येते. तसेच आधार लिंकद्वारे १० हजार रुपयांपर्यंत पैसेही काढता येतात. पोस्टमनकडून घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करता येतो. तसेच बाल आधार योजनेअंतर्गत लहान मुलांचे पहिले आधार कार्ड मोफत काढून देण्यात येते. त्याचबरोबर पोस्टाच्या बँक खात्याद्वारे डायरेक्ट बेनिफिट सबसिडी देण्यात येते. तसेच सदर बँक खाते हे सर्व शासकीय योजनांसाठी ग्राह्य धरले जात असल्याचे श्री. एरंडे यांनी सांगितले.

गतिशीलता आणू : कराड डाक विभागांतर्गत कराड, पाटण, खटाव, आणि माण हे चार तालुके येतात. या संपूर्ण डाक विभागाचे एका महिन्यांत गतिशील कामकाज दिसेल, अशी ग्वाही देताना डाक अधीक्षक श्री. एरंडे म्हणाले, कराड विभागाच्या चार्ज स्वीकारल्या क्षणापासून आपण सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देण्यासह डाक विभागाचे कामकाज गतिशील करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काही आवश्यक फेरबदल करण्यात येतील.

ग्राहकांच्या सूचना अथवा व तक्रारींना प्राधान्य : ग्राहकांनाही कोणत्या गोष्टींबाबत तक्रार अथवा काही सूचना करावयाच्या असतील, तर त्यांचे म्हणणे प्राधान्याने ऐकून घेण्यात येईल. तसेच त्याबाबत त्यांचे सकारात्मक समाधानही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

लाभदायी योजना : पोस्टाच्या सेवा व योजनांबाबत बोलता श्री. एरंडे म्हणाले, पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना आणि महिला सन्मान बचत पत्र योजना अत्यंत लाभदायी आहे. तसेच टपाल जीवन विमा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (अपघाती विमा योजना), डाक घर बचत बँक आदी योजनांचीही त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.

The post पोस्टाच्या लाभदायी सेवा घरोघरी पोहोचविणार  first appeared on Jan Swarashtra.

]]>
https://janswarashtra.com/archives/4769/feed 0