महालिंग राजमाने यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शुभचिंतनातून जिव्हाळा आणि आपुलकी जपण्याचा प्रयत्न – राजमाने

कराड/प्रतिनिधी : –

कराड पंचायत समितीचे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी, तसेच राज्य पुरस्कारप्राप्त गुणवंत कर्मचारी महालिंग शकुंतला भानुदास राजमाने यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी कराड येथे शुभचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी व कराड शहर वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी-कर्मचारी, तसेच पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

पारदर्शक कामकाजाची दखल : महालिंग राजमाने यांनी कराड पंचायत समितीत प्रशासन अधिकारी म्हणून दीर्घकाळ कार्यरत राहून आपल्या कार्यतत्परतेने आणि मनमिळावू स्वभावाने प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली.

आदर्श गुणवंत कर्मचारी म्हणून गौरव : महालिंग राजमाने यांच्या आदर्श आणि पारदर्शक कामकाजाची दखल पंचायत समितीसह जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली होती. त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्यासाठी राज्य शासनाने त्यांचा आदर्श गुणवंत कर्मचारी म्हणून गौरव केला होता.

सक्रिय सहभाग : श्री. राजमाने यांचा प्रशासकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठा लोकसंग्रह आहे. सेवानिवृत्तीनंतरही ते विविध प्रशासकीय कामकाजात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असून, सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत आहेत.

जिव्हाळा आणि आपुलकी : वाढदिवसासारख्या शुभप्रसंगी शुभचिंतन कार्यक्रमातून जिव्हाळा आणि आपुलकी जपण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मत महालिंग राजमाने यांनी यावेळी व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन ढापरे, तसेच हेमंत पवार, अशोक मोहने, संदीप चेनगे, संतोष शिंदे, प्रतिभा राजे, दीपक पवार, राजेंद्र मोहिते, संतोष गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

सल्लागारपदी एकमताने निवड

जिल्हा परिषद शाळा क्रमांक  – १, वाटेगाव (ता. वाळवा) येथील माजी विद्यार्थी संघाचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी महालिंग राजमाने यांची सल्लागारपदी एकमताने निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल माजी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!