कराड दक्षिणेला विकासासाठी बूस्टर डोस

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

५२ गावांतील ६.५० कोटींच्या कामांना मंजुरी; कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून पायाभूत सुविधांना बळ

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तब्बल ५२ गावांमध्ये विविध विकासकामांसाठी ६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून ही मंजुरी मिळाली असून, कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमार्फत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता : मुख्यमंत्री तथा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विकासकामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली. मंजूर निधीपैकी ५० टक्के रकमेचा धनादेश सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला असून, लवकरच कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

कामे व मंजूर निधी : यामध्ये शेरे येथील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), आटके येथील भैरवनाथ मंदिरास सभामंडप बांधणे (१५ लाख), रेठरे बुद्रुक पवार मळी येथे स्मशानभूमीस घाट बांधणे (२० लाख), रेठरे खुर्द येथील महादेव मंदिरास सभामंडप बांधणे (१५ लाख), कापील येथे पाचवड वस्ती – सावंत मळा – पाळसकर वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे (१० लाख), कोडोली येथील आरोग्य उपकेंद्रास संरक्षण भिंत बांधणे (२० लाख), गोळेश्वर येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (९.९७ लाख), दुशेरे येथे अंतर्गत रस्ता सुधारणा करणे (१० लाख), बेलवडे बुद्रुक येथे धनगर समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे (१० लाख), वाठार येथील जिल्हा परिषद शाळेत सभागृह बांधणे (२० लाख), काले येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (९.९६ लाख), नांदगाव येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), कुसुर येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), पोतले येथील स्मशानभूमी रस्ता, संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), वनवासमाची येथील पाटील वस्तीमध्ये ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), चचेगाव येथील स्मशानभूमी दुरुस्त करणे (१० लाख), गोटे येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (८.८२ लाख), कोयना वसाहतीतील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), धोंडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंत बांधणे (१० लाख), चौगुले मळा येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षित भिंत बांधणे (१० लाख), सवादे येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), साळशिरंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन खोली बांधणे (१४.९९ लाख), म्हासोली येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), सैदापूर येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), वहागाव येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर सभामंडप बांधणे (१४.९७ लाख), शेणोली येथील ओढ्यावर संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), संजयनगर (शेरे) येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), जुळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नवीन खोली बांधकाम करणे (१५ लाख), खुबी येथील सिद्धनाथ मंदिर सभामंडप बांधणे (२५ लाख), गोंदी येथील नवीन गावठाण येथे बंदीस्त गटर करणे (१५ लाख), कार्वे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली बांधणे (१५ लाख), कासारशिरंबे येथील तालिमच्यावर नवीन व्यायामशाळा बांधणे (१० लाख), ओंड येथील निनाई ओढ्यावर निनाई मंदिरानजीक साकव पूल बांधणे (४८.३० लाख), किरपे येथील स्मशानभूमी रस्ता, संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), कोळे येथील दत्त मंदिर ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), येरवळे येथील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), विंग येथे खंडोबा मंदिर परिसर संरक्षक भिंत बांधणे (१४.९९ लाख), वारुंजी येथील सतीआई मंदिर ते मारुती मंदिरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), ओंडोशी येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), मनव येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), येणपे येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), तुळसण येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (८.९७ लाख), खोडशी येथे महादेव मंदिर परिसर संरक्षण भिंत बांधणे (१० लाख), टाळगाव येथील ग्रामपंचायत सभागृह बांधणे (१० लाख), मालखेड येथील स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे (१५ लाख), लटकेवाडी रस्ते सुधारणा (५ लाख), शेवाळवाडी पाटीलवाडी (म्हासोली) येथील स्मशानभूमी दुरुस्त करणे (१० लाख), येणके येथील वांग नदी ते जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत बांधणे (१५ लाख), नारायणवाडी येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (८.९० लाख), येवती येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), जिंती येथे नवीन व्यायाम शाळा इमारत बांधणे (१० लाख), गोटेवाडी येथील नळपाणी पुरवठा योजना सुधारणा करणे (१५ लाख) अशी विकासकामे केली जाणार आहेत.

आभार : या निधीमुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होणार असून, सार्वजनिक व सामाजिक सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंतर्गत रस्ते व संरक्षण भिंतींच्या कामांना गती मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. निधी मंजुरीबद्दल ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार अतुल भोसले, तसेच भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!