कराडमध्ये श्री साई पालखी स्नेहसोहळ्याचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

रविवारी विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम; साई भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन

कराड/प्रतिनिधी : –

श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाने कराड येथे श्री साई पालखी स्नेहसोहळा २०२६ भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. श्री साई पालखी सोहळा समिती, कराड यांच्या वतीने रविवारी (दि. ११) जानेवारी रोजी या भव्य स्नेहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साईबाबा पालखी सोहळा समिती, कराडचे संस्थापक उदयसिंह शं. देसाई यांनी केले आहे.

विशेष मार्गदर्शन : या स्नेहसोहळ्यास श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षजी गाडीलकर (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच प. पू. गोविंद वासुदेव रानडे (नामस्मरण, कोल्हापूर) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमास सुरेशराव वाबळे, दिलीप रोहम, प्रकाशशेठ कुतवळ, डॉ. संजय सावंत, जयसिंग पवार, अनिल शिंदे, डॉ. शिवाजीराव कुंडलकर, विनोद शहा, दिलीपशेठ यादव, रविंद्र आहेर, सुभाषभाई शहा, राजेंद्र आहेर आदी साईभक्त मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा : कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५.१५ वाजता साईंच्या काकड आरतीने होणार आहे. त्यानंतर संतकवी दासगणू महाराज विरचित श्री साईनाथ स्तवनमंजरी वाचन, श्री साई पादुकांचा महाअभिषेक, श्री साईसत्यव्रत महापूजा, श्री साई सच्चरित सामुदायिक पारायण व संतकवी दासगणू महाराज विरचित गुरुपाठाचे अभंग व प. पू. गोविंद वासुदेव रानडे हे निरामय आरोग्याचा राजमार्ग याविषयी मार्गदर्शन करणार असून, असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

माध्यान्ह आरती व महाप्रसाद : दीप प्रज्वलन १२.३० वाजता, त्यानंतर मान्यवरांचे विचार व मार्गदर्शन होणार असून, दुपारी १ वाजता श्री साईंची माध्यान्ह आरती व त्यानंतर साईंचा महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे.

साईभजनांचा विशेष सुस्वर सोहळा : दुपारी १ ते ५ या वेळेत ‘झाले तुझे दर्शन साई’ हा मराठी-हिंदी साईभजनांचा विशेष सुस्वर सोहळा रंगणार आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण : हा भक्ती, सेवा व स्नेह यांचा संगम असलेला सोहळा पंकज मल्टिपर्पज हॉल, पुणे-बंगळूर हायवे, कराड येथे होणार आहे.

आवाहन : साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री साई पालखी सोहळा समिती, कराड यांच्यावतीने अध्यक्ष उदयसिंह शं. देसाई यांनी केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!