नलावडे अध्यक्ष, थोरात उपाध्यक्ष; कारखाना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व नियोजन सुरू
कराड/प्रतिनिधी : –
रयत सहकारी बायोशुगर संस्था मर्यादित, कराड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी तानाजीराव नलावडे (पार्ले) व उपाध्यक्षपदी धनंजय थोरात (कालवडे) यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
एकमताने निवड : निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड प्रक्रिया शांततेत व एकमताने पार पडली.
कारखाना कार्यान्वित करण्याचे नियोजन : कोयना – रयत समूहातील ही संस्था असून, स्व. लोकनेते विलासकाका पाटील (उंडाळकर) यांचे मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली ही संस्था ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. सहकार क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून उभारलेल्या या संस्थेचे उत्पादन अद्याप सुरू झालेले नसले, तरी भविष्यात कारखाना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया व नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
संचालक मंडळाचे प्रयत्न : संस्थेच्या पुढील विकासासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर), आदिराज पाटील (उंडाळकर) यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संस्थेचे संचालक राजेंद्र पाटील, भाऊसो मंडले, अधिकराव जगताप, अविनाश पाटील, विश्वास कणसे, विश्वनाथ नांगरे, महादेव मोरे, तानाजी जाधव, चंद्रकांत पवार, कृष्णा माने, रामचंद्र पातले, नागेश मोरे, नामदेव रामिष्ठे, अजित पाटील, रेखा कचरे, हेमा पारवे, संस्थेचे सचिव शामराव जांभळे आदी उपस्थित होते.