सुमारे २००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग; निरोगी आरोग्यासाठी धावण्याचा संदेश
कराड/प्रतिनिधी : –
कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे आयोजित ‘कृष्णा मॅरेथॉन’ला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सुमारे २००० हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेत, निरोगी आरोग्यासाठी धावण्याचा संदेश दिला.











