सातारा येथील ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आगामी काळात साताऱ्यात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, (पुणे) शाखा शाहूपुरी आणि मावळा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रतिष्ठेच्या संमेलनाचे आयोजन होत असून विविध समित्यांची विस्तार प्रक्रिया सुरू आहे.
सन्मानपूर्वक निवड : संमेलनाच्या स्वागत समितीवर कराड ग्रामीण येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, (पुणे) शाखा कराड ग्रामीणचे अध्यक्ष गोरख तावरे यांची सन्मानपूर्वक निवड करण्यात आली आहे. दि. गुजराथी अर्बन क्रेडिट सोसायटी, भवानी पेठ, सातारा यांच्या माध्यमातून मावळा फौंडेशनतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात गोरख तावरे यांचे साहित्यिक कार्य, सातत्याने दिलेले योगदान आणि संमेलनासाठी अपेक्षित सहकार्य यांचा गौरव करण्यात आला आहे.
अभिनंदन : कार्याध्यक्ष श्री. विनोद कुलकर्णी यांनी या नियुक्तीची माहिती देत गोरख तावरे यांचे अभिनंदन केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे.
निवडीचे स्वागत : गोरख तावरे हे पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य असून, प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आहेत. गोरख तावरे यांच्या निवडीचे साहित्य-सांस्कृतिक वर्तुळात स्वागत होत असून, त्यांच्या सहभागामुळे संमेलन अधिक भक्कम आणि यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.