शरद पवारांच्या हस्ते कर्नल संभाजी पाटील यांना तैलचित्र प्रदान 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रपती वेंकटरामन यांच्या स्वागताच्या ऐतिहासिक क्षणाचे दादासाहेब सुतार यांच्याकडून अप्रतिम रेखाटन 

कराड/प्रतिनिधी : –

१९८८ साली जामनगर (राजस्थान) येथे महामहिम राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांच्या स्वागतावेळी स्टेशन कमांडर म्हणून कार्यरत असलेल्या कर्नल संभाजी पाटील यांच्या ऐतिहासिक क्षणाचे जेष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांनी साकारलेले भव्य तैलचित्र शनिवारी, दि. ६ डिसेंबर खासदार शरद पवार यांच्या हस्ते संभाजी पाटील यांना प्रदान करण्यात आले.

तैलचित्र प्रदान सोहळा : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील कार्यालयात सकाळी ९.३० वाजता पार पडलेल्या या सोहळ्यात पवार साहेबांनी चित्रकार दादासाहेब सुतार यांच्या कलाकृतीचे मनःपूर्वक कौतुक करत ‘इतिहास जिवंत करणारी ही कलाकृती अत्यंत स्तुत्य आहे’ अशा शब्दांत अभिनंदन केले.

मान्यवरांची उपस्थिती : या सोहळ्यास प्रा. भगवान खोत व चित्रकार कुमारी भाग्यश्री सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सेवाभिमानाचा गौरव : भारताचे माजी संरक्षणमंत्री असलेल्या पवार साहेबांच्या हस्ते झालेला तैलचित्र प्रदान सोहळा कर्नल संभाजी पाटील यांच्या सेवाभिमानाचा गौरव करणारा ठरला.

संस्कृतीच्या जतनाला हातभार : दरम्यान, दादासाहेब सुतार यांनी साकारलेली ही कलाकृती केवळ सैनिकी इतिहासाची आठवण नव्हे; तर भारतीय कला संस्कृतीच्या जतनाला हातभार लावणारी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!