कराडमध्ये धडाडणार एकनाथ शिंदेंची तोफ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकशाही व यशवंत विकास आघाडीची आज संयुक्त सभा; शंभूराज देसाई आणि बाळासाहेब पाटीलांचीही उपस्थिती

कराड/प्रतिनिधी : –

कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांनी आपली ताकद एकवटत संयुक्त जाहीर सभेचे आयोजन केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्यासह दोन्ही आघाड्यांचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा शक्तिप्रदर्शनाचा महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.

मान्यवरांची उपस्थिती : या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आघाडीचे मार्गदर्शक व माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हेही सभेत विचार मांडणार असून, निवडणूक रणधुमाळीला ऊर्जितावस्था मिळणार आहे.

…यांचीही होणार भाषणे : यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख गणेश कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतीलाल पाटील यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव मान्यवरांच्या उपस्थितीत आपले विचार मांडणार आहेत.

वेळ व ठिकाण : शुक्रवार, दि. २८ रोजी सायं. ५ वा. कराड येथील कन्याशाळा, मंगळवार पेठ येथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. कराडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आघाडीच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!