मालखेड, ता. कराड येथे सालाबाद प्रमाणे गुरुवार, दि. १३ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सांप्रदायिक भक्तीसोहळ्याचे आयोजन श्री विष्णू लक्ष्मी मंदिर येथे करण्यात आले.
कार्यक्रमांची रूपरेषा : या सोहळ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे, गुरूवार, दि. १३ रोजी दुपारी १ ते ४ भजन ग्रामस्थ भजनी मंडळ, रात्री ९ वाजता कलारंजन शालेय मुलांचा कार्यक्रम शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी ७ वाजता पालखी सोहळा, दुपारी १२ वाजता महाप्रसाद
आवाहन : तरी परिसरातील सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालखेड व जुने मालखेड ग्रामस्थ, भजनी मंडळ, तांबवेकर बंधू यांनी केले आहे.