मलकापूर पालिकेसाठी राष्ट्रवादी समविचारी पक्षांसह लढणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

मलकापूर नगरपालिका निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) यांनी केला आहे. या निर्णयामुळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.

राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूला करून निवडणूक एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या बैठकीत समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मान्यवर, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : सदर बैठकीस राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील-वाठारकर, राष्ट्रवादी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, कराड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप, कराड दक्षिण राष्ट्रवादी महिला अध्यक्षा दिपिका जाधव, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष महादेव शिंदे, प्रा. धनाजीराव काटकर, नितीन थोरात, सविनय कांबळे, माजी नगरसेवक सागर जाधव, अमर इंगवले, जयंत कुराडे, किशोर येडगे, पंडित शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकीत चुरशीचे वातावरण : या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी रणनीती, उमेदवार निवड प्रक्रिया, तसेच स्थानिक पातळीवरील समन्वय यावर सविस्तर चर्चा झाली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याच्या या निर्णयामुळे मलकापूर नगरपालिका निवडणुकीत चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!