कराडमध्ये भाजपची घोडदौड वेगवान; जि.प, पं.स निवडणुकीत भाजपचा एकहाती विजय होईल
कराड/प्रतिनिधी : –
कराड शहरानजीकच्या मोठ्या सैदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव यांच्यासह चरेगाव, साबळवाडी, चितळवाडी आदी गावांतील सरपंच, सदस्य आणि मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार डॉ. अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत झाला. प्रवेशामुळे कराड दक्षिण आणि उत्तरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.
विकासाची वाटचाल अधिक गती घेईल : याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक बांधिलकी जपणारे नेते पक्षात दाखल होत आहेत. आमदार अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली विकासाची वाटचाल अधिक गती घेईल, असे त्यांनी सांगितले.












