नामदेवराव पाटील; दिवाळीनिमित्त फराळ संवाद कार्यक्रम उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असून, कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता एकजुटीने कामाला लागावे, अशा सूचना देत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनतेच्या सहकार्याने निश्चितच विजय मिळवेल, असा विश्वास कराड दक्षिण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी व्यक्त केला.
फराळ संवाद : दिवाळीनिमित्त आयोजित फराळ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.












