समीर जोशी यांचा सदाशिवगडावर सत्कार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड अर्बन बँकेच्या चेअरमनपदी झाल्याबद्दल सदाशिव गडकरी परिवाराने दिल्या शुभेच्छा 

कराड/प्रतिनिधी : –

किल्ले सदाशिवगडावर समीर सुभाषराव जोशी यांची कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कराडच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सदाशिव गडकरी परिवारातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी वृक्षमित्र नरेंद्र मुळीक, आबासो लोकरे, डॉ. अमित देशमुख, ॲड. वसंतराव मोहिते, ॲड. संजय काळभोर, लालासो जगताप, राजेश शहा, धनंजय होणगेकर, गजानन माने, दत्ता पवार, राहुल जाधव, पैलवान शामराव मुळीक, पंकज पांढरपट्टे, शंकर खोचरे, किरीटभाई शहा, मावजी पटेल, जितेंद्र ओसवाल, हरीश ओसवाल, खंडू इंगळे, रिटायर पी.एस.आय. शिवराज माने, दिलीप दीक्षित, जालिंदर पवार, पुजारी, श्रीधर कलबुर्गी, जयेश खंडेलवाल, मनीष खंडेलवाल, भूपेंद्र मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

विश्वास : याप्रसंगी सदाशिव गडकरी परिवाराने समीर जोशी यांच्या नेतृत्वाखाली बँकेची प्रगती अधिक गतीने व्हावी आणि सर्वसामान्य जनतेसाठी बँक आदर्श ठरावी, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!