‘सह्याद्री’च्या अध्यक्षांनी सभासदांचा हक्क पायदळी तुडवला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

निवासराव थोरात; सह्याद्री कारखान्याच्या वार्षिक सभेवरून अध्यक्षांवर टीका

कराड/प्रतिनिधी : – 

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळून कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सभासदांचा आपल्या समस्या, प्रश्न मांडण्याचा हक्क पायदळी तुडवला असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषदेचे सदस्य निवासराव थोरात यांनी केला.

पत्रकार परिषद : येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी शैलेश चव्हाण, भरत चव्हाण, आनंदराव थोरात, विश्वास जाधव यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.

विस्ताराबाबत प्रश्न : निवासराव थोरात म्हणाले, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सभा नुकतीच झाली. या सभेत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना पाच वर्ष रखडलेल्या कारखान्याच्या विस्ताराबाबत सभासदांनी प्रश्न उपस्थित केले होते.

प्रश्नांवर टुकार उत्तरे : यामध्ये नवीन विस्तारीकरणासाठी कोणत्या कंपन्यांनी टेंडर भरले, कोणाला काम सोपवले गेले? या प्रश्नांसह टेंडर प्रक्रियेबाबतचे दस्तऐवजही मागितले. मात्र अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी या प्रश्नांवर टुकार उत्तर देऊन सभा संपवली. उलट वैयक्तिक कर्जाबाबत टीका करून माहिती मिळवण्यासाठी साखर आयुक्तालयाकडे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

सभासदांवर दडपशाही : थोरात म्हणाले, साखर आयुक्तांकडून कारखाना प्रशासनाला माहिती पुरवण्याचे आदेश असूनही, ती अद्याप मिळालेली नाही. तसेच, मयत वारसदार सभासदांच्या प्रश्नांनाही त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाही. यावरून सभासदांवर दडपशाही होत असल्याचा आरोप करत हा प्रकार लांच्छनास्पद असून, ते सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!