आगाशिव डोंगरावर नऊ दिवसीय भव्य किर्तन महोत्सव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

तालुक्यातील आगाशिव डोंगरावर योगीराज बाबा महाराज समाधी मठात 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत नऊ दिवस पुणेतील सच्चिदानंद प्रासादिक दिंडीच्यावतीने भव्य किर्तन महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे.

नामांकित किर्तनकारांची सेवा : या महोत्सवात नामांकित किर्तनकारांची सुश्राव्य किर्तनसेवा होणार असल्याची माहिती आयोजक गणेश महाराज साळुंखे यांनी दिली.

प्रथम किर्तन महोत्सव : आगाशिव डोंगरावर किर्तन महोत्सव प्रथमच होत आहे. याबाबत माहिती देताना आयोजक गणेश महाराज साळुंखे (वडोली भिकेश्वर) म्हणाले, यंदा विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा 750 वा जन्मोत्सव सोहळा, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 375 वा वैकुंठ गमन सोहळा, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा आणि पालखी सोहळा, जनक तपोनिधी नारायण महाराज यांचा 375 वा जन्मोत्सव सोहळा राज्यभरात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आगाशिव डोंगरावर किर्तन सोहळा आयोजीत केला असून, राज्यातील विविध भागातील एकूण अठरा किर्तनकार आपली कीर्तनसेवा निशुल्क करणार आहेत.

काकड आरती, हरिपाठ, कीर्तन : सकाळी काकड आरती, सायंकाळी हरिपाठ आणि रोज सकाळी व रात्री 9 ते 11 अशी दोन कीर्तने होणार आहेत. आगाशिव भक्त मंडळ आणि जखिणवाडतील भोलेबाबा ग्रूपचे त्यासाठी सहकार्य आहे. 7 ऑक्टोबर रोजी कोपर्डे हवेलीतील अभिजीत महाराज चव्हाण यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!