पितृछत्र नसतानाही विक्रमादित्य यादव जलसंधारण अधिकारी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

नारायणवाडी विकास सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदा एक प्रेरणादायी क्षण घडला. पितृछत्र नसतानाही जिद्दीने शिक्षण घेऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागात स्थापत्य अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या विक्रमादित्य यादव याचा सत्कार करण्यात आला.

सातत्य व अथक मेहनत : कै. दिलीप यादव हे सोसायटीचे माजी सभासद व कराड तालुका सहकारी संस्थेचे निष्ठावान सेवक होते. त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर घरची जबाबदारी मोठी होती. तरीही विक्रमादित्यने परिस्थितीला हरवून अभ्यासात सातत्य, अथक मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कठीण परीक्षा उत्तीर्ण करत जलसंधारण अधिकारी पदवी प्राप्त केली.

स्वप्ने साकार करण्याची ही जिद्द : सत्कारप्रसंगी सोसायटीचे चेअरमन कृष्णात यादव म्हणाले, पितृहीन हरऊनही स्वप्ने साकार करण्याची ही जिद्द ग्रामीण भागातील युवकांसाठी आदर्श आहे. अशा तरुणांना प्रोत्साहन देणे हे सोसायटीचे कर्तव्य आहे. यावेळी प्रथमेश पाटील (सहाय्यक अभियंता, महावितरण), प्रवीणकुमार यादव (मुंबई पोलीस दलात नियुक्ती) व शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या इतर विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

…कधीही हार मानली नाही : सत्कार स्वीकारताना विक्रमादित्य यादव म्हणाले, वडिलांच्या स्मृतींनी परिस्थितीसमोर मी कधीही हार मानली नाही. सोसायटीचा हा सन्मान माझ्यासाठी आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे. कठीण परिस्थिती ही यशाची सीडी असते. त्यांच्या या शब्दांनी सभागृहात उपस्थित सर्वांची मने भारावली.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाला सोसायटीचे उपाध्यक्ष प्रमोद हरदास, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी शरद पाटील, सचिव संजय कारंडे व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!