राजश्री पाटील; कराड उपविभागीय पोलीस कार्यालय व सुखायु फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा
कराड/प्रतिनिधी : –
आज बदललेल्या जीवनशैलीमुळे अगदी कमी वयापासून अनेक आजार मागे लागत आहेत. असे आजार टाळण्यासाठी सर्वांनी आयुर्वेद आणि योग उपचारांना आपल्या रोजच्या जीवनाचा भाग करण्याचा संकल्प आज आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने करुया, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी केले.
राष्ट्रीय आयुर्वेद दिवस : दि. २३ सप्टेंबर हा दिवस भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस घोषित केला आहे. यानिमित्त कराडमधील सुखायु फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने पोलिस बांधव-भगिनींसाठी संधिवात आणि व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजश्री पाटील बोलत होत्या.












