विलासकाकांच्या योगदानाची युवकांना जाणीव

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अॅड. उदयसिंह पाटील; साजुर येथे युवकांशी साधला संवाद

कराड/प्रतिनिधी : –

साजुर गावाने नेहमीच स्व. लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या विचारांची पाठराखण केली आहे. काकांचे साजुर गावातील विकासकामांमध्ये मोठे योगदान आहे. याची येथील युवकांना जाणीव असल्याचे आज प्रकर्षाने जाणवले असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजितदादा पवार) पार्टीचे नेते, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केले.

बैठक : साजुर, ता. कराड येथे आयोजित बैठकीवेळी अॅड. उदयसिंह पाटील यांनी युवकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.

अडचणी सोडवण्याचा प्रयत्न : याप्रसंगी येथून पुढेही आतापर्यत जशी साथ दिलीत, तशीच साथ राहू दया. आपण मांडल्यात अडचणी प्रामणिकपणे सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन, अशी ग्वाही अॅड. पाटील यांनी उपस्थितांना दिली.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी विक्रम मूळगांवकर, प्रा. धनाजी काटकर, प्रदिप पाटील, श्रीमंत काटकर, रघुनाथ नलवडे, हणमंत देसाई-वाठारकर, ज्येष्ठ नेते हणमंतराव चहाण, मोहन चव्हाण, संजय मूळगांवकर, विक्रम मूळगावकर, सरपंच शतिल मूळगांवकर, संजय चव्हाण, वैभव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!