पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांचा सन्मान : सन २०२५ चा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती, भारत फोर्ज पुणेचे अध्यक्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती : ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्याहस्ते व राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
अभिवादन : प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी ९.३० वाजता आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांच्या, श्री शिवाजी हायस्कूल, कराड येथील समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
आवाहन : या कार्यक्रमासाठी कराड आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. गुजर व सर्व विश्वस्तांच्यावतीने करण्यात आले आहे.