प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त गोटे येथे रक्तदान शिबिर उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

६० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पहिल्यांदाच महिला रक्तदात्याचा सहभाग ठरला कौतुकास्पद

कराड/प्रतिनिधी : –

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त गोटे (ता. कराड) येथील युथ फ्रेंड्स ग्रुप आणि मातोश्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ५ रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गावकऱ्यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

महिला रक्तदात्याचे सहभाग : या शिबिराची खास वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गावातील सौ. आफ्रिन अमीर सय्यद या पहिल्याच महिला रक्तदात्याने सहभाग नोंदवला. महिलांनीही अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, हा संदेश त्यांनी दिला.

रक्तदाते व आयोजकांचे कौतुक : शिबिराला भेट देताना कराड पंचायत समितीचे माजी सदस्य नामदेव पाटील यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून, प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, असे मत व्यक्त केले. कराड शहर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे व पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.

नियमित उपक्रम राबवावेत : संकल्प ब्लड बँकेचे पी.आर.ओ. भैय्यासाहेब मुलाणी यांनी एक रक्तदाता तीन जणांचे जीव वाचवू शकतो. सामाजिक संघटनांनी असे उपक्रम नियमित राबवले पाहिजेत, असे सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : या शिबिरात युथ फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य, गोटे ग्रामपंचायतीचे सदस्य अॅड. साबीर अशरफ मुल्ला यांच्यासह गावातील ज्येष्ठ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संकल्प ब्लड बँकेच्या डॉ. स्वरूपा जाधव, डॉ. रिधा अन्सारी, स्वप्नील कदम यांच्यासह वैद्यकीय पथकाने शिबिराची जबाबदारी सांभाळली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!