शिष्टमंडळाची भेट : नाबार्डचे डेप्युटी जनरल मॅनेजर आशुतोष जाधव, असिस्टंट जनरल मॅनेजर ॲलेन केरकेट्टा, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे डेप्युटी मॅनेजर प्रशांत देशमुख, डेप्युटी मॅनेजर गणेश नलवडे, डेव्हल्पमेंट ऑफिसर संतोष कासकर यांनी कृष्णा कारखान्यास सदिच्छा भेट दिली.
विशेष कौतुक : यावेळी शिष्टमंडळाने कृष्णा कारखान्याच्या पारदर्शी व उत्कृष्ट वाटचालीबद्दल चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांनी कारखान्यातील खातेप्रमुख, अधिकारी यांच्याशी संवाद साधला.
योजनेची माहिती : प्रारंभी, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे व कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी अधिकाऱ्यांना कृष्णा कारखाना राबवित असलेल्या सभासद हिताच्या योजनांची माहिती, मोफत घरपोच साखर, जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत जीवाणू खत प्रकल्प उभारणी व एकरी १०० टन उत्पादन वाढ योजनेची माहिती दिली.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, प्रोडक्शन मॅनेजर शशिकांत पाटील, फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने, चिफ अकौंटंट पंडित झांझुर्णे, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.