सभासद, कर्जदारांच्या पाठबळामुळे संस्थेची यशस्वी वाटचाल – वसंतराव मोहिते
कराड/प्रतिनिधी : –
बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ब्रह्मदास पतसंस्थेच्या सन 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि वितरण संस्थेचे संस्थापक वसंतराव मोहिते यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासदांच्या हस्ते बेलवडे बुद्रुक येथील संस्थेच्या प्रधान कार्यालयात उत्साहात करण्यात आले.
शेतकरी, सभासद, नव उद्योजकांना पाठबळ :याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक वसंतराव मोहिते म्हणाले, संस्थेच्या प्रधान कार्यालयासह महिला पतसंस्था, तसेच कासारशिरंबे आणि शेणोली शाखेच्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य सभासद, नव उद्योजकांना संस्थेतर्फे आर्थिक पाठबळ दिले जाते. त्यामुळे या सभासद, ठेवीदार, कर्जदारांच्या पाठबळामुळे संस्थेची आज यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मोफत वितरण : ब्रह्मदास पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिकचे प्रकाशन केले जाते. यामध्ये विविध सण, समारंभ, उत्सव यांसह शेतकऱ्यांसाठी आवश्यक माहिती नमूद केलेली असल्याने ही दिनदर्शिका सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते आहे. सभासदांच्या थेट घरी, तसेच कर्जदार उद्योजकांच्या व्यवसायाच्या ठिकाणी दिनदर्शिकेचे प्रत्यक्ष वितरण मोफत केले जात असल्याने त्यांच्याकडूनही समाधान व्यक्त होत असल्याचे श्री मोहिते यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संस्थेचे सभासद सेवानिवृत्त शिक्षक हंबीरराव मोहिते, माणिकराव मोहिते, संभाजी मोहिते, संदीप मोहिते, पांडुरंग पवार, सुनील मोहिते, मानसिंग शिंदे, संस्थेच्या व्यवस्थापिका मनीषा मोहिते, कॅशियर अर्चना मोहिते, क्लार्क सुनील मोहिते, सेवक शिवाजी तडाके यांच्यासह सभासद उपस्थित होते.