अथणी – रयत शुगर्सचे 3200 रुपये  ऊस बील बँकेत जमा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांची माहिती 

कराड/प्रतिनिधी : – 

शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याने गळीत हंगाम सन 2024-25 मधील दि. 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत  गळीत केलेल्या ऊसाचे प्रति मे.टन  3200 रूपये प्रमाणे ऊस बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले असल्याची माहिती अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली.

बँकेची संपर्क साधा : संबंधित शेतकऱ्यांनी आपले खाते असलेल्या बँकेची संपर्क साधावा असे आवाहन ही अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी यावेळी केले. 

उपस्थित मान्यवर : यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, अथनी कंपनीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी. एफ. ओ. योगेश पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सुशांत पाटील व युनिट हेड  रविन्द्र देशमुख उपस्थित होते.

सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित : अथणी-रयत शुगर्स लि. कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पुर्ण केले असून पुर्ण वाढीव क्षमतेने कारखान्याचे गाळप सुरू आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प देखील कार्यान्वित झाला आहे. 

11.28 टक्क्यांनी साखर उतारा : अथणी शुगर्सच्या रयत युनिटने चालू गळीत हंगामात दि. 26 डिसेंबर 2024 अखेर 187230 मे. टन ऊस गाळप केले असून सरासरी 11.28 टक्क्यांनी साखर उतारा राखत 2 लाख 8 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. शेतकऱ्यांचे हित विचारात घेवून चालू गळीत हंगामातील गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाचे पेमेंट दर पंधरवडयास एकरक्कमी 3200 रूपये प्र. मे. टन प्रमाणे अदा करणार असल्याची माहितीही श्रीनिवास पाटील यांनी दिली.

ऋणनिर्देश : ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले आहेत. याप्रसंगी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!