शिक्षकचं खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बिपिन मोरे; कराड रोटरीतर्फे शिक्षकांच्या गौरव व 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

कराड/प्रतिनिधी : –

आई-वडिल मुलांवर संस्कार करतात. तर ज्ञानदानासह मुलांमध्ये आचार, विचार आणि नीती मूल्ये रूजवण्याचे काम शिक्षक करतात. यातून देशाचे भावी सुजाण नागरिक घडवण्याचे काम शिक्षकांच्या हातून होत असल्याने शिक्षकचं खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता आहेत. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ कराडने शिक्षकांचा ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने केलेला सन्मान सार्थ असल्याचे मत कराड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी केले.

पुरस्कार वितरण : रोटरी क्लब ऑफ कराडच्या पुरस्कार वितरण व 2025 च्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ, कराडचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार होते.

आदर्श शिक्षकांचा सन्मान : या कार्यक्रमात शिक्षिका सौ. उर्मिला शिवाजी पाटील, सौ. निलम प्रदिपकुमार पाटील, सौ. विद्या दिलीप चव्हाण व शिक्षक रमेश पांडुरंग पवार व सचिन प्रकाश शेवाळे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रोटरी क्लब कराडच्या सन 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
करण्यात आले.

मनोगत : कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. फोर वे टेस्ट वाचन बद्रीनाथ धस्के यांनी केले. वाढदिवस व पत्रव्यवहार वाचन सेक्रेटरी आनंदा थोरात यांनी केले. उपस्थितांचे स्वागत रामचंद्र लाखोले यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना शिवराज माने व डायरेक्टर लिटरसी यांनी केली. पुरस्कार प्राप्त शिक्षकांची ओळख शुभांगी पाटील, गजानन कुसुरकर, दिलीप पाटणकर, विशाल घुटुकडे, प्रवीणकुमार शिंदे यांनी करून दिली. डॉ. अनिल हुद्देदार, सौ. उर्मिला पाटील व रमेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजगोंडा अपीने यांनी, तर आनंदा थोरात यांनी आभार मानले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

मान्यवर : उपक्रमास किरण जाधव, जगदीश वाघ, बद्रीनाथ धस्के, जयंत जगताप, रघुनाथ डुबल, डॉ. मनोज जोशी, शुभांगी पाटील, विकास देसाई, डॉ. गजेंद्र पवार, अभिजित गोडसे, प्रवीण कुमार शिंदे, दिलीप पाटणकर, विशाल घुटुकडे, गजानन कुसुरकर, राजगोंडा अपीने, आनंदा थोरात, कुमारी हर्षला देशमुख व श्रीमती रेखा आदींची उपस्थिती होती.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!