कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या पवित्र स्मृतींना 100 व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
अभिवादन : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, श्री. विनायक भोसले यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, दयानंद पाटील, वसंतराव शिंदे, बाबासो शिंदे, जे. डी. मोरे, आनंदराव मोहिते, विलासराव पवार, अशोकराव पवार, सर्जेराव थोरात, पैलवान आप्पासाहेब कदम, माणिकराव पाटील, सरपंच बाळासाहेब पाटील, दादा शिंगण, प्रमोद पाटील, चंद्रकांत देसाई, विश्वास काळभोर, सत्यजीत काळभोर, शिवाजीराव पवार, आर. टी. स्वामी, धनाजी जाधव, उपसरपंच उमेश कुलकर्णी, गजेंद्र पाटील, डॉ. सुशील सावंत, विनायक धर्मे, भारत जंत्रे, उमेश शिंदे, व्ही. के. मोहिते, डॉ. सारिका गावडे, राजू मुल्ला, सुरज शेवाळे, तातोबा थोरात, एम. के. कापूरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.