अथणी शुगर्स लि.चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर आणि सी.एफ.ओ. योगेश पाटील यांची साऊथ इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या प्रेसीडेंट पदावर निवड झाली आहे.
अथणी शुगर्सचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर : योगेश पाटील हे अथणी शुगर्स लि. या कंपनीचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर असून ते ऑल इंडीया शुगस मिल्स असोसिएशन (इस्मा), नवी दिल्ली आणि वेस्टर्न इंडीया शुगर ही मिल्स असोसिएशन (विस्मा), पुणे या संस्थांचे डायरेक्टर म्हणून गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहेत.
सरकार दरबारी समस्या मांडू : साखर उद्योगातील प्रश्नांचा सखोल अभ्यास असल्याने या उद्योगाच्या अडचणी सरकार दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी सिस्मा, इस्मा आणि विस्माच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू, असा विश्वास योगेश पाटील यांनी व्यक्त केला.
साखर उद्योगातील योगदान : साखर उद्योगातील त्यांचे योगदान विचारात घेता योग्य व्यक्तीची निवड झालेबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.