कराड/प्रतिनिधी : –
आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेने आधुनिकतेची कास धरत कॅश डिपॉझिट व एटीएम मशीन सुविधेसह अन्य सुविधाही सभासद, ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर संचालक मंडळासह अधिकारी कर्मचाऱ्यांनीही चांगले कामकाज केल्याने ही बँक परिसरातील खातेदार, सभासद, ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहिली असल्याचे मत राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
शुभारंभ : साकुर्डी (ता. कराड) येथे आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेच्या 15 व्या नूतन शाखेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी बँकेचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन मुकुंद कुलकर्णी, निवासराव पाटील, प्रकाश पाटील, नाथाजी मोहिते, अण्णासो पाटील, बलराज पाटील, रामचंद्र पाटील, अशोकराव चव्हाण यांचे प्रमुख उपस्थिती होती.
शून्य टक्के एनपीए असलेली बँक : आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेची स्थापना 1995 साली झाल्याचे सांगत श्री. पाटील म्हणाले, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सर्व नियमांना अनुसरून बँकेचे कामकाज सुरू आहे. शून्य टक्के एनपीए असलेली ही बँक असून, प्रतिवर्षी सभासदांना लाभांश देण्याची परंपरा कायम सुरू आहे. सभासदांनीही बँकेच्या सर्व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उपस्थिती : सूत्रसंचालन ॲड. चंद्रकांत कदम व आर. जी. तांबे यांनी केले. प्रास्ताविक व्हा. चेअरमन मुकुंदराव कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास विश्वास निकम, रवींद्र ताटे, संभाजी संकपाळ, अनिल केंजळे, एच. डी. पाटील, बाळासो सूर्यवंशी, भीमराव ढमाले, अधिक पवार, अनुज पाटील, विजय सूर्यवंशी, संभाजी साळवे, मोहम्मद आवटे, विजयकुमार पाटील, साहेबराव गायकवाड, विजय चव्हाण, विजय पाटील, विकास संकपाळ, भीमराव इंगवले, डी. बी. जाधव, पै. संजय थोरात, सुहास कुलकर्णी, मारुती सुर्वे, निवास शिंदे, तुकाराम घोडके, गौरव पाटील, हनुमंत सुर्वे, राजेंद्र कदम, नंदकुमार बटाणे, चंद्रकांत कदम, बाळासाहेब जगदाळे यांच्यासह बँकेचे सभासद, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.