‘कृष्णा’चे शेतकरी ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी रवाना

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने 43 शेतकरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे येथे आयोजित ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले.

दरवर्षी प्रशिक्षण : दरवर्षी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे प्रशिक्षण दिले जाते. या शिबिरात सहभागी होण्याची संधी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील 43 शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे.

शेतकऱ्यांना शुभेच्छा : कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांनी सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना शुभेच्छा दिल्या.

तज्ञांचे मार्गदर्शन : या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात सांगली, सातारा, मराठवाडा व खानदेशमधील हजारो शेतकरी सहभागी होत असतात. शिबिरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मान्यवरांनी प्रशिक्षणास रवाना होणाऱ्या शेतकरी सभासदांना शुभेच्छा दिल्या. 

उपस्थिती : यावेळी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, एच. आर. मॅनेजर संदीप भोसले, फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने, प्रभारी कार्यालयीन अधीक्षक विलास पाटील, स्टोअर किपर गोविंद मोहिते, संरक्षण अधिकारी संजय नलवडे, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर यांच्यासह सर्व अधिकारी, सर्कल ऑफिसर, शेती मदतनीस व कर्मचारी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!