सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानवंदना 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

समाधिस्थळी विजय दिवस समिती व तळबीड ग्रामस्थांतर्फे अभिवादन 

कराड/प्रतिनिधी : – 

विजय दिवस समारोह समिती – कराड, तळबीड ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड (ता. कराड) येथील समाधीस्थळी सोमवारी अभिवादन करण्यात आले.

अभिवादन : भारताने बांग्लादेश युध्दात मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ दरवर्षी कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून येथे मोठ्या दिमाखात विजय दिवस समारोह साजरा केला जातो. विजय दिवसाच्या आजच्या मुख्य दिवशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड येथील समाधीस्थळी विजय दिवस समारोह समिती व तळबीड ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात येते.

साभार : कोल्हापूर महानगरपालिका संकेतस्थळ.

ताराराणींचा सन्मान : मराठा साम्राजाचा इतिहास जाज्वल्य असून तो नव्या पिढापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे सांगत कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोल्हापूर महापालिकेच्या लोगोमध्ये ताराराणींचा फोटो आहे, ही गौरवास्पद बाब आहे. तळबीडला 400 वर्षांचा इतिहास आहे. तो इतिहास आणि वारसा जतन करण्याचे काम तळबीडकर करत आहेत, याचे समाधान आहे. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 

तळबीड : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी अभिवादन प्रसंगी मान्यवर. 

सैनिक अधिकारी निर्माण करण्यात सहभाग : कर्नल संभाजीराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत विजय दिवस समारोह समितीच्यावतने पहिले सैनिकी प्रशिक्षण सुरु केले असल्याचे संगत  प्राचार्य डॉ. मोहन राजमाने म्हणाले, सैनिक अधिकारी निर्माण करण्यासाठी एसजीएम कॉलेजचा मोठा सहभाग असेल. तळबीडच्या विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणासाठी आवश्यक ती मदत एसजीएम कॉलेजकडुन केली जाईल. कर्नल समीर कुलकर्णी, कर्नल हांगे सैनिकी भरतीसंदर्भात मार्गदर्शन केले. 

मान्यवरांचा मानपत्र : तळबीड ग्रामपंचायतीच्यावतीने कुलगुरु डॉ. शिर्के, लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव यांना मानपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सलीम मुजावर, राजीव अपिने यांनी मानपत्राचे वाचन केले. सरपंच मृणालिनी मोहिते यांनी प्रास्तविक केले. जयवंतराव मोहिते यांनी आभार मानले.

तळबीड : अभिवादन कार्यक्रमप्रसंगी मान्यवर.

उपस्थिती : सोमवारी सकाळी सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक कर्नल सतेश हांगे, कर्नल समीर कुलकर्णी, लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव, शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, एसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, विजय दिवस समारोह समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, संचालक सलीम मुजावर, चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक विनायक पावसकर, सौरभ पाटील, तळबीडच्या सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच दादासाहेब मोहिते, माजी सरपंच जयवंतराव मोहिते, ग्रामसेवक सुनिल ढाणे, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, बाजीराव गायकवाड, शंकरराव मोहिते, शामराव मोहिते, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते, ए. आर. पवार, सलीम मुजावर, माणिक बनकर, प्रसाद पावसकर, प्रफुल्ल ठाकूर, चंद्रशेखर नखाते, मोहन डोळ, रत्नाकर शानभाग, प्रा. बी. एस. खोत, अॅड. भंडारे, राजीव अपिने, अनिल मोहिते, बेलवडे बुद्रुकचे प्रशांत मोहिते, जयप्रकाश मोहिते, उमेश मोहिते, राजेंद्र मोहिते सैन्यदलातील अधिकारी व उद्यान ग्रुपचे सहकारी यांनी अभिवादन केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!