पंचेचाळीस जणांनी बजावले रक्तदानाचे कर्तव्य

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

विजय दिवस समारोह समितीच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

विजय दिवस समारोह समितीच्यावतीने कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला.

रक्तदानाचे कर्तव्य : यशवंत ब्लड बॅंकेच्या सहकार्याने झालेल्या रक्तदान शिबिरात सैन्यदलातील अधिकारी यांच्यासह 45 नागरिकांनी रक्तदान केले.

उद्घाटन : येथील शिवाजी आखाड्यात झालेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कराड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, मलकापुरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शिवसेनेचे नितीन काशिद, उद्योजक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

मान्यवरांची उपस्थिती : विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचिव विलासराव जाधव, संचालक सलीम मुजावर, रक्तदान उपक्रमाचे प्रमुख रमेश पवार, प्रा. जालिंदर काशिद, पर्यावरण मित्र चंद्रकात जाधव, प्रा. भगवान खोत, रत्नाकर शानभाग, लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव, सागर जाधव, संतोष पवार, कासमआली पटवेगार, हेमंत पवार, ए. आर. पवार, आत्माराम अर्जुगडे, चंद्रशेखर नकाते, महालिंग मुंढेकर, राजगौंडा अपीने, माणिक बनकर, प्रफुल्ल ठाकूर, रमेश शहा आदि उपस्थित होते.

कराड : कासमअली पटवेगार यांचा सत्कार करताना रमेश पवार. समवेत राजगोंडा अपिने, विलासराव जाधव, अॅड. संभाजीराव मोहिते, प्रा. भगवान खोत, सलीम मुजावर, राजेंद्र पाटील, मनोहर शिंदे, ए. आर. पवार, शारदा जाधव आदी.

16 वर्षे रक्तदान : यावेळी कासमअली पटवेगार यांनी 16 वर्षे रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटनादरम्यान लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव, सागर जाधव, संतोष पवार, कासमआली पटवेगार यांनी रक्तदान करुन शिबिरास प्रारंभ केला. रक्तदान शिबिरात 45 नागरिकांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!