‘सह्याद्रि’चे लेझर क्लिनिक आरोग्यसेवेत नवा आदर्श निर्माण करेल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. सुनील राव; लेझर क्लिनिकचे उद्घाटन, जनरल सर्जरी, यूरोलॉजी आणि इंटरव्हॅशनल रेडिओलॉजीमध्ये प्रभावी 

कराड/प्रतिनिधी : – 

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराडमध्ये सुरू करण्यात आलेले लेझर क्लिनिक कराड – सातारा भागातील रुग्णांसाठी प्रगत आरोग्यसेवेची संधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मोठ्या शहरांत जाण्याची गरज भासणार नाही. अद्ययावत लेझर तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित, जलद, आणि अचूक होऊन रुग्णांना वेदना कमी व जलद बरे होण्याचा अनुभव मिळेल. त्यामुळे हे क्लिनिक स्थानिक आरोग्यसेवेत नवा आदर्श निर्माण करेल, असे प्रतिपादन सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ. सुनील राव यांनी केले.

उद्घाटन : प्रगत लेझर तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांच्या विविध आरोग्य समस्यांवर प्रभावी उपचार करू शकणारे लेझर क्लिनिक सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराडमध्ये सुरु होत आहे. या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन डॉ. सुनील राव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी लेझर तंत्रज्ञानाची गरज आणि फायदे सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी डॉ. सुनील राव यांच्यासह हॉस्पिटलचे युरोसर्जन डॉ. युगल जैन, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी सल्लागार डॉ. केदार गोराड, संचालक दिलीपभाऊ चव्हाण व अमित चव्हाण, इंटरवेनशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. दिग्विजय घोडके, युनिट हेड डॉ. अमित माने आदी मान्यवर तज्ञ उपस्थित होते.

अतिशय त्रासदायक आजारांवर प्रभावी उपचार : या क्लिनिकमध्ये यापुढे व्हेन्स व्हेरीकोज, पाईल्स, फिशर्स, फिस्चुला, किडनी स्टोन अशा सामान्य, पण अतिशय त्रासदायक ठरणाऱ्या आजारांवर प्रभावी उपचार करता येतील. या अत्याधुनिक लेझर उपकरणांमुळे उपचारांची अचूकता वाढेल आणि रुग्णांचा त्रास लक्षणीयरित्या कमी होईल. विशेषतः जनरल सर्जरी, यूरोलॉजी आणि इंटरव्हॅशनल रेडिओलॉजी या शाखांमध्ये या क्लिनिकचे अधिक प्रभावी परिणाम दिसून येतील.

एक मोठे पाऊल : ही नवीन सुविधा म्हणजे आधुनिक आणि प्रगत आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर पोहोचवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे सांगताना दिलीपभाऊ चव्हाण म्हणाले, कराड येथे ही सुविधा उपलब्ध करून देऊन आम्ही कराड, सातारा आणि आजूबाजूच्या भागातील रुग्णांसाठी वेदनेपासून मुक्ततेसाठी नवीन आशा घेऊन आलो आहोत.

शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमी त्रास : लेझर उपचार पद्धतींमुळे सामान्य शस्त्रक्रियेच्या तुलनेत रुग्णांचा त्रास खूपच कमी होत असल्याचे सांगत डॉ. अमित माने म्हणाले, मूळव्याध, भगेंद्र (फिशर), फिस्टुला, किडनी स्टोन आणि व्हेरीकोज व्हेन्स यांसारख्या विकारांवर लेझर उपचार अचूक, वेदनामुक्त आणि जलद बरे होण्यास मदत करणारे ठरतात. लेझरमुळे मूतखड्यांचा वेगाने नाश होतो आणि प्रक्रिया अधिक अचूक होते. याशिवाय, टाके किंवा मोठ्या शस्त्रक्रियेची गरज नसल्याने रुग्णांना त्वरित दैनंदिन कामांसाठी परतता येते. संसर्गाची शक्यता कमी असल्याने उपचार अधिक सुरक्षित ठरतात. ऑगस्टपासून आम्ही 100 पेक्षा अधिक वेरीकोज वेन्स आणि 15 मूळव्याध संबंधित रुग्णांवर यशस्वी लेझर उपचार केले आहेत. या तंत्रज्ञानाचा रुग्णांवर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसतो, ज्यामुळे रुग्णांचा वेळ, खर्च आणि त्रास कमी होण्यास मदत होते.

लेझर उपचारांचे फायदे : याप्रसंगी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी लेझर उपचारांच्या फायद्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. लेझर उपचार कशाप्रकारे काम करतात, इतर उपचारांपेक्षा ते अधिक प्रभावी ठरत असल्याने त्यातून रुग्ण कशाप्रकारे वेदनामुक्त होतात यावर त्यांनी प्रकाश टाकला.

वैद्यकीय सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील 

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड, ही अत्याधुनिक वैद्यकीय सेवा कराड आणि सातारा भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. सुपर स्पेशालिटी लेझर क्लिनिकचे उद्घाटन हे त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, अशी ग्वाही डॉक्टरांनी यावेळी बोलताना दिली. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!