मार्गशीर्ष महिन्यातील महात्म्य; भक्तांनी घेतला दहीभाताच्या प्रसादाचा लाभ
कराड/प्रतिनिधी : –
दक्षिण काशी म्हणून लौकिक असलेल्या कराडनगरीच्या प्रवेशद्वारावर स्थानापन्न दैत्यनिवारणी देवीची मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या मंगळवारी (दि. १०) दहीभाताने विशेष पूजा बांधण्यात आली.
वर्षातून एकदा विशेष पूजा : दैत्यनिवारणी देवीची वर्षातून एकदा ही अशी पूजा बांधण्यात येते. सायंकाळी पाच वाजता दैत्यनिवारणीला गारवा करण्यात आला. सर्व भक्तांनी दहीभाताच्या प्रसादाचा लाभही घेतला.
कोयनामाई म्हणूनही ओळख : दैत्यनिवारणी देवीला कोयनामाई म्हणूनही ओळखले जाते. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी युवती आणि महिला वर्गाची देवीच्या दर्शनासाठी गर्दी असते.
मार्गशीर्ष महिन्यातील पूजेचे विशेष महत्त्व
मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी देवीला अनन्यसाधारण मूल्य आहे. तसेच सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त होते, अशी भक्तगणांची भावना आहे. कराडमध्ये कृष्णामाई आणि उत्तरालक्ष्मी देवीच्या पुजेलाही अनन्य साधारण महत्व आहे.