श्री शिवप्रतिष्ठानतर्फे ‘शिवप्रताप’चा जागर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराडमध्ये देवदर्शन पदयात्रा; शेकडो धारकऱ्यांची उपस्थिती

कराड/प्रतिनिधी : –

येथील शिवतीर्थ दत्त चौकात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर ध्वज व शस्त्र पूजन, तसेच प्रेरणा मंत्र म्हणून शिवतीर्थ, भवानी मंदिर, पांढरीचा मारुती मंदिर ते पुन्हा शिवतीर्थापर्यंत देवदर्शन पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत शेकडो धारकरी, शिवप्रेमी, युवक व नागरिक सहभागी झाले होते.

अफजलखान वध : मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1659 मध्ये किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूरकर्मा अफजलखानाचा वध केला. त्या दिनाची आठवण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन भूमी : अफजलखान वधानंतर शिवरायांनी अल्पावधीत किल्ले प्रतापगड ते पन्हाळगडापर्यंतचा मुलुख काबीज केला होता. यादरम्यान त्यांनी कराड येथील कृष्णा – कोयनेच्या प्रीतिसंमात आपली शस्त्रे धुतली होती. असे सांगितले जाते. त्यानुसार शिवप्रताप दिनासह छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत त्यांच्या पराक्रमाला, शौर्याला उजाळा देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून देवदर्शन पदयात्रा काढण्यात आली.

कराड : शस्त्र व ध्वज पूजन प्रसंगी धारकरी.

ध्वज व शस्त्र पूजन : प्रारंभी, शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्वज व शस्त्र पूजन करण्यात आले. तसेच प्रेरणा मंत्र, तसेच “मराठा म्हणावे अशा वाघराला” हे स्फूर्ती गीत म्हणून शिवतीर्थ, भवानी मंदिर, पांढरीचा मारुती मंदिर ते पुन्हा शिवतीर्थापर्यंत देवदर्शन पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर ध्येयमंत्र म्हणून ध्वज उतरवल्यानंतर या यात्रेची सांगता करण्यात आली. या पदयात्रेमुळे शहरातील वातावरण शिवमय झाले होते.

कराड : “मराठा म्हणावे अशा वाघराला” या शौर्य गीतासह शिवरायांचा जयघोष करताना धारकरी व शिवप्रेमी.

शिवरायांचा जयघोष : याप्रसंगी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा गर्जना देत परिसर दणाणून सोडला. या पदयात्रेत शेकडो धारकरी, शिवप्रेमी, युवक व नागरिक सहभागी झाले होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!