कराड/प्रतिनिधी : –
श्री समर्थ पादुका पूजन व दर्शन सोहळ्याचे कराडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यासाठी श्री. रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड येथून श्री समर्थ पादुकांचे कराडमध्ये आगमन झाले असल्याची माहिती रामदासी श्री समीरबुवा आराणके यांनी दिली.
स्वामींच्या पादुकांचे आगमन : प्रतिवर्षीप्रमाणे दासनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री. रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड येथून श्री समर्थ पादुकांचे कराडमध्ये आगमन झाले आहे. या पादुकांचे भाविकांनी मोठ्या भक्ती भावात स्वागत केले.
पादुका पूजन व दर्शन : सोमवार पेठ कराड येथील आराणके वाड्यात रामदासी श्री समीर आराणके यांच्या घरी बुधवार, दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वामींच्या पादुका पूजन व दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामदासी श्री समीरबुवा आराणके यांनी केले आहे.
दासनवमी उत्सवासाठी भीक्षा : श्री. रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड येथील दासनवमी निमित्त होणाऱ्या उत्सवासाठी भीक्षा स्वीकारण्यात येणार आहे. यामध्ये गहू, तांदूळ, हरभरा, डाळ, गुळ, त्याचबरोबर रोख दक्षिणाही स्वीकारण्यात येणार आहे.