मतमोजणी अचूक, खोडसाळपणावर विश्वास ठेवू नका

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांचे स्पष्टीकरण

कराड/प्रतिनिधी : –

260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत गफलत झाल्याचे दर्शवणारा चुकीच्या आकडेवारीचा तक्ता समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. परंतु, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी याबाबत खुलासा केला असून सदरची मतमोजणी अचूक असल्याचे सांगत आकडेवारी जाहीर केली आहे. तसेच अशाप्रकारच्या खोडसाळपणावर मतदार, नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मतदान केंद्र क्र. 164 (कराड) : 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या शनिवार, दि. 23 रोजी पार पडलेल्या मतमोजणी अंती कराड शहरातील मतदान केंद्र क्र. 164 या मतदान केंद्रातील यंत्रामध्ये एकूण मतदान 514 नोंदविले आहे. त्यापैकी डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांना एकूण 357 इतके मतदान झाले असून पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण यांना 150 इतके मतदान झाले आहे. तर इतर उमेदवारांना 7 इतके मतदान झाले आहे.

अज्ञात व्यक्तीचा खोडसाळपणा : वर नमूद केल्याप्रमाणे वस्तुस्थिती असताना समाजमाध्यमांमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे चुकीची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. मात्र, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे श्री. म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

चुकीची माहिती : वरीलप्रमाणे वस्तुस्थिती असून प्रसारित होणाऱ्या मजकूरामध्ये दर्शवण्यात आलेल्या तक्त्यात डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांना 557 मते व पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण यांना 150 मते, अशी मतदानाची आकडेवारी मतमोजणी प्रतिनिधी यांनी अनावधानाने दर्शविली असून ती पुर्णत: चुकीची आहे.

माहिती बिनचूक : सबब निवडणूक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या फॉर्म नंबर. 20 नुसार निवडणूक निर्णय अधिकारी 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांनी प्रसिद्ध केलेली माहिती बिनचूक व बरोबर आहे. त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या मजकुरावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. म्हेत्रे यांनी नागरिक, मतदारांना केले आहे.

मतमोजणी आकडेवारीतील सत्यता 

  • मूळ आकडेवारी : 

    केंद्र क्र. 164 वर झालेले एकूण मतदान – 514

  • डॉ. अतुलबाबा भोसले यांना मिळालेली मते – 357

  • पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेली मते – 150

  • इतर उमेदवारांना मिळालेली मते – 7

  • चुकीची आकडेवारी :

  • डॉ. अतुलबाबा भोसले यांना मिळालेली मते – 557

  • पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेली मते – 150

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!