हॅपी थॉट्स’ नावाने ओळखली जाणारी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. या विशेष प्रसंगी, ज्ञान ध्यान केंद्र, कराड तेजस्थान फाउंडेशनतर्फे रविवार, दि. 1 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत यशवंतराव चव्हाण सभागृह, टाऊन हॉल कराड येथे ‘रजत जयंती ध्यान महोत्सव’ (सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तेजस्थान फाउंडेशन, कराडतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
प्रमुख पाहुणे : या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिक्कीमचे माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे संस्थापक इंद्रजीत देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्त्व : तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे.
शांतता आणि आनंद पसरवण्याचे उद्दिष्ट : तेजज्ञान फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशन सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक आमंत्रित करत आहोत. अधिक माहितीसाठी 9922275659 / 9022302398 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.