नागपूरला 15 डिसेंबर रोजी पत्रकारांचे 19 वे राज्य संमेलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल महाराष्ट्रतर्फे आयोजन  

कराड/प्रतिनिधी : – 

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्रचे 19 वे राज्य संमेलन नागपूर येथे रविवार, दि. 15 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनास सर्व पदाधिकारी सदस्य पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, संमेलनाचे निमंत्रक ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्रचे प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत, राज्य संपर्कप्रमुख अरविंद जाधव व नवी मुंबईचे अध्यक्ष संजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

संमेलनाचे ठिकाण : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्रचे 19 वे राज्य संमेलन नागपूर येथे रविवार, दि. 15 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत प्रेस क्लब, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. 

संमेलनाची रूपरेषा : एकूण तीन सत्रात हे संमेलन पार पडणार मान्यवर जेष्ठ पत्रकारंकडून उपस्थितांना विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सत्र पहिले : या सत्रास सकाळी 11 वाजता प्रारंभ होणार असून ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्रचे विश्वस्त अतुल होनकळसे हे स्वागत व प्रास्ताविक करणार आहोत. संमेलनाचे उद्घाटक प्रेस क्लब, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, समारंभ अध्यक्ष एजेएफसीचे केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय खवसे (नागपूर), डिजिटल मिडिया अभ्यासक देवनार गडाते (नागपूर), वरिष्ठ पत्रकार, पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू लॉडे असणार आहेत. या सत्रात “माझी पत्रकारिता” या विषयावर दुपारी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळी 10 पत्रकारांचे आत्मकथन सादर करण्यात येणार आहे.

सत्र दुसरे : या सत्रात दुपारी 12.30 ते दुपारी 2 वेळेत “आजची पत्रकारिता व आम्ही” या विषयावर समारंभाचे अध्यक्ष दिनकरराव पतंगे मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे (नागपूर), ज्येष्ठ पत्रकार गणेश गोडसे (बार्शी – सोलापूर), ज्येष्ठ पत्रकार निलेश पोटे (अकोट – अकोला), ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल मोघे (दौड – पुणे), ज्येष्ठ पत्रकार दिपक नागरे (सिंदखेड, राजा – बुलढाणा) उपस्थित राहणार आहेत.

सत्र तिसरे : या सत्रात दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत “संघटनेचे ठराव आणि गौरव समारंभ” संपूर्ण होणार आहे. या समारंभाचे प्रमुख अध्यक्ष एजेएफसी संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल असणार आहेत. या सत्रात राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, विश्वस्त अतुल होनकळसे, केंद्रीय खजिनदार सत्यवान विचारे, मुंबई अध्यक्ष निसार सय्यद आणि एजेएफसीचे सर्वप्रमुख केंद्रीय व राज्य पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!