कराड/प्रतिनिधी : –
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहमीच लोकांच्या कल्याणाला प्राधान्य दिले. राज्याच्या औद्योगिकीकरणाला, रोजगार निर्मितीला त्यांनी चालना दिली. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले नक्कीच करतील. कराड दक्षिण मतदारसंघातील जनतेने, विशेषतः तरुण पिढी आणि महिलांनी डॉ. अतुलबाबांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. येत्या काळात ते स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी काम करतील, अशी ग्वाही यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
अभिवादन : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे डॉ. सुरेश भोसले यांनी प्रीतिसंगमावरील स्व. चव्हाण साहेबांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते या प्रमुख मान्यवरांसह माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, आप्पा माने, सौ. विद्या पावसकर, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, रमेश लवटे, विष्णू पावसकर, गिरीश शहा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश पाटील – वाठारकर यांच्या निवासस्थानी डॉ. सुरेश भोसले यांनी ना. पवार यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. ऋतुजा पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.