‘कृष्णा’चे 15 लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. सुरेश भोसले: 65 व्या गळीत हंगामास उत्साहात प्रारंभ

कराड प्रतिनिधी : –

कृष्णा कारखान्यात गाळपासाठी अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप शक्य होणार आहे. या हंगामात 15 लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे.

गळीत हंगामाचा शुभारंभ : कृष्णा कारखान्याच्या 65 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते व कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून 65 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती : कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक महावीर घोडके, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कारखान्याचे आधुनिकीकरण :  अत्याधुनिकीकरणामुळे 80 टक्के कारखाना नवीन झाला असल्याचे सांगताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, यंदाचा गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने पार पडेल, याची संचालक मंडळाला खात्री आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे संचालक मंडळाचे प्रयत्न असून, तोडणीबाबतच्या कोणत्याही तक्रारी उद्‌भवणार नाहीत, याबाबतही काळजी घेतली जात आहे.

सहकारी तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांना मदत : निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह कराडला आले असता, त्यांच्याकडे सहकारी उपसा जलसिंचन योजनांना सहकार्य करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे सांगताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रस्ताव दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कृष्णा कारखाना संलग्नित सहकारी तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांना मदत मिळू शकेल. कारखान्याचे चांगल्या पद्धतीने आधुनिकीकरण झाल्याने, यंदाचा हंगाम यशस्वीपणे पार पडेल.

विधीवत पूजा : कृष्णा कारखान्याचे संचालक जे. डी. मोरे व त्यांच्या पत्नी सौ. सुमित्रा मोरे यांच्या शुभ हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी कारखान्याचे सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार, कंत्राटदार, व्यापारी, कारखाना अधिकारी, कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती.

तोडणीबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन 

यंदाचा गळीत हंगाम सुरळितपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तोडणी कार्यक्रम वेळापत्रकानुसार काटेकोरपणे राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून, तोडणीबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्याच्यावतीने हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!